esakal | सावधान ! तुमचीही ऑनलाइन फसवणूक होऊ शकते
sakal

बोलून बातमी शोधा

under the syber crime incresed online fraud people share he OTP and alll banking details with fruad people in ratnagiri

सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन फसवणूक करून सुमारे सव्वा ४ लाख रुपये लुटल्याचे पुढे आले आहे. 

सावधान ! तुमचीही ऑनलाइन फसवणूक होऊ शकते

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : लॉकडाउनच्या काळातही चोरट्यांनी पैसे कमविण्याचा पर्याय शोधत जिल्ह्यातील आठजणांना गंडा घातला. गेल्या सहा महिन्यात कोणत्याही गंभीर, अतिगंभीर किंवा किरकोळ गुन्ह्यांना आळा बसला; मात्र सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन फसवणूक करून सुमारे सव्वा ४ लाख रुपये लुटल्याचे पुढे आले आहे. 

जिल्ह्यात हे गुन्हे सावर्डे, खेड, संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा या ठिकाणी दाखल झाले आहेत. यातील सर्वांत जास्त चार गुन्हे हे चिपळूण येथील आहेत. ऑनलाइन फसवणुकीमध्ये एखाद्या अनोळखी मोबाईल नंबरवरून कॉल येतो आणि बोलणारा ‘मी बॅंकेतून बोलत असून तुमच्या एटीएम कार्डची सेवा बंद झाली आहे. ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी तुमच्या कार्डवरील १६ अंकी नंबर आणि पिन नंबर द्या’, असे सांगतो. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अनेक नागरिक सर्व माहिती देतात आणि काहीवेळाने बॅंक खात्यातून पैसे काढल्याचे मेसेज आले की, डोक्‍याला हात लावतात.

हेही वाचा - पिवळा मळा नादखुळा ; पिवळ्या धमक हातांनी उघडली प्रगतीची कवाडे

आतापर्यंत शहरी भागातील मध्यम आणि उच्च मध्यम वर्गापर्यंत मर्यादित असणाऱ्या हे सायबर गुन्हेगारीचे प्रकार ग्रामीण भागातही घडत आहेत. ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढू लागल्या आहेत. या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी आर्थिक लूट सुरूच ठेवली आहे. ऑनलाइन बॅंकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड फसवणूक आणि अन्य माध्यमांतूनही गुन्हेगारांनी सामान्यांच्या पैशांवर डल्ला मारण्यास सुरवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर झाले. त्यामुळे सहज पैसे कमविण्यासाठी सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

लॉकडाउनमुळे अनेकांनी घरातच बसून काम करण्यास प्राधान्य दिले. आजही अनेकजण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. अनेकांचा ऑनलाइन व्यवहार करण्याकडे कल आहे.  कॅशबॅकच्या नावाखाली गुन्हेगार ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लक्ष्य करत आहेत. गुन्हेगारांच्या जाळ्यात तरुणवर्गही अडकत आहे. काही ठिकाणी तर केवायसी अपडेटचेही कारण पुढे करत नागरिकांच्या बॅंक खात्यातील रकमेवर डल्ला मारला आहे. ऑनलाइन बॅंकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकीचा आकडा सर्वाधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा - शिक्षक घडविणाऱ्या ‘डीएलएड’ कडे का फिरवताहेत विद्यार्थी पाठ ?

अशी माहिती देऊ नका

सायबर गुन्ह्यांचा छडा लागण्याचे प्रमाण कमी आहे. यात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या फोन कॉल्सना बळी न पडता आपल्या बॅंक खात्याची आणि एटीएमकार्डची माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन सायबर सेलने केले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

loading image