'या' बेरोजगार पदवीधराने फुलवला प्रगतीचा मळा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unemployment Graduate Suhas Success In Business Kokan Marathi News

दुग्धव्यवसाय, भाजीपाला लागवडीतून स्वयंपूर्ण... सुहास गोरीवले याने विविध फळझाडांची यशस्वी लागवड करत उत्पन्नाचा मार्ग  शोधला...   

'या' बेरोजगार पदवीधराने फुलवला प्रगतीचा मळा...

मंडणगड रत्नागिरी : श्रम करण्याची मानसिकता असेल तर खडतर प्रवासात कसा मार्ग काढता येतो, याचा वस्तुपाठ मंडणगड शहरातील दुर्गवाडी येथील सुहास जयराम गोरीवले या तरुणाने घालून दिला आहे. दुग्धव्यवसाय सोबतच विविध प्रकारची भाजीपाला लागवड करून आपल्या उत्पन्नाचा मार्ग त्याने निवडला आहे. यातून त्याला चांगला आर्थिक फायदा होत आहे. 

कला शाखेची पदवी घेतलेल्या सुहासने नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तीन वर्षांपासून दुग्ध व्यवसायात त्यांनी आपला जम बसवला आहे. आज त्यांच्याकडे संकरित जर्सी 9 मोठ्या, तर 2 छोट्या गाई असून दिवसाला 32 लिटर दूध मिळते. घरोघरी त्यांचे ग्राहक बांधले गेले आहेत. शेणाचा उपयोग खत म्हणून केला जात असल्याने त्यालाही मागणी आहे. यासोबतच घरापासून थोड्याच अंतरावर सात गुंठे जागेवर विविध प्रकारची भाजीपाला लागवड केली आहे.

हेही वाचा- ब्लू व्हेल मासा का मरण पावतो.... वाचा
 
सुहासने नोकरीच्या मागे न लागता वेगळा मार्ग अवलंबला

त्याला तारेचे कुंपण घातले आहे. गेल्या वर्षांपासून याठिकाणी माठ, मुळा, पालक, मोहरी, कोथिंबीर, काकडी, दुधी, पडवळ, केळी, कलिंगड यांचे उत्पादन घेत आहे. तसेच काजू, आंबा, पेरू या फळझाडांची लागवड त्यांनी केली आहे. तयार झालेली भाजी शहरातील बाजारपेठ व वाडीतील घरोघरी विकली जाते. भाजीपाला विक्रीतून त्यांना आर्थिक लाभ होतो आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांने कुक्कटपालन सुरू केले आहे. आपला संपूर्ण दिवस वेळेच्या चाकोरीत फिट केला असून याकामी त्यांचा भाऊ सौरभ हा मदतीला उभा आहे. सौरभला देखील याची आवड निर्माण झाली असून आयटीआयचे वर्ग सुटल्यानंतर तो कामात स्वतःला व्यस्त करून घेतो. 

हेही वाचा- कशाने भारावले परदेशी पाहुणे कोल्हापुरात....

 सकाळ, संध्याकाळ शेतात; दिवसभर ग्रामपंचायत 
सुहास सकाळी दोन तास व संध्याकाळी चार वाजल्यानंतर तीन तास शेतात काम करतो. यादरम्यान पाणी लावणे, रोपांची पाहणी करणे, मशागत सुरू असते. तसेच दिवसभर तालुक्‍यातील पडवे, उंबरशेत या ग्रामपंचायत कार्यालयात डाटा ऑपरेटर म्हणून काम करतो. 


हेही वाचा- धुरळा आला कोल्हापूरकरांच्या मुळावर... -


पाण्याची उपलब्धता पडते कमी
तीन वर्षांपासून तारेवरची कसरत सुरू आहे. पाण्याची उपलब्धता पुरेशी नसल्याने लागवड क्षेत्र वाढविण्यावर बंधने येत आहेत. सध्या बोअरिंगवरच सर्व अवलंबून आहे. पाण्याची गैरसोय दूर झाल्यास उत्पन्नात वाढ होवू शकते. 
- सुहास गोरीवले, दुर्गवाडी.