
कोल्हापूरचा आणि रोमचा प्राचीन काळातील व्यापारी संबंध, कोल्हापूरची चित्र-शिल्प परंपरा यानिमित्ताने पाहूण्यांनी अनुभवला.....
'कशाने' भारावले परदेशी पाहुणे कोल्हापुरात....
कोल्हापूर :महाराष्ट्र पर्यटन विकासाचा भाग म्हणून सुरू झालेल्या डेक्कन ओडीसी या आलिशान रेल्वेतून आज एकोणसाठ परदेशी पर्यटकांनी कोल्हापूरचा पाहुणचार स्वीकारला. अस्सल कोल्हापुरी संस्कृती, कोल्हापूरचा बावीसशे वर्षापूर्वीचा इतिहास, कोल्हापूर संस्थानची परंपरा या साऱ्या गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या. ‘पॅलेस ऑन व्हील’च्या धर्तीवर देशातील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची सफर घडविण्यासाठी डेक्कन ओडीसी रेल्वे चालविली जाते.
हेही वाचा- अजबच : एकाच जमिनीचे दोन व्यवहार...
आरामदायी आसन व्यवस्थेपासून विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण सुविधा असलेल्या या रेल्वेचा प्रवास सुरू झाला. आज सकाळी रेल्वे कोल्हापुरात आली. त्यांचे येथे खास कोल्हापुरी पध्दतीने स्वागत झाले. त्यानंतर खासगी बसमधून पर्यटकांना अंबाबाई मंदिर, जुना राजवाडा, नवीन राजवाडा, टाऊन हॉल येथील कोल्हापूर वस्तू संग्रहालय, दूध कट्टा, कोल्हापुरी चप्पल आदींची माहिती देण्यात आली.
हेही वाचा- फडातला संसार फडातच झाला खाक
चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी पाहूण्यांचा ठोका चुकला
कोल्हापूरचा आणि रोमचा प्राचीन काळातील व्यापारी संबंध, त्याचे पुरावे, ब्रम्हपुरी उत्खननात सापडलेले दुर्मिळ अवशेष, कोल्हापूरची चित्र-शिल्प परंपराही यानिमित्ताने त्यांनी अनुभवला. नवीन राजवाडा येथे संस्थानकालीन विविध वस्तूंची माहिती त्यांनी जाणून घेतली. ऐतिहासिक भवानी मंडपात मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही पर्यटकांना दाखवण्यात आली. मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. गेल्या महिन्यात आलेल्या डेक्कन ओडिसीतून युके आणि तुर्की येथील परदेशी साठ पर्यटक आले होते.