
Ratnagiri Police : रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉट येथे समुद्रात पडलेली ती अज्ञात तरुणी ३७ तास झाले तरी अद्याप बेपत्ताच आहे. पोलिस व आपत्कालीन पथकांची शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, नाशिकमधून एक तरुणी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ती तरुणी रविवारी रत्नागिरीत आली होती. रत्नदुर्ग किल्ल्यावरून शहरातील एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून तिने मित्राला फोन केला होता. त्यानंतर ती गायब झाली आहे. यावरून समुद्रात पडलेली तरुणी तीच असण्याची शक्यता असून, रत्नागिरीतील एका बॅंक अधिकाऱ्याची याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.