

Unseasonal Rains Cause
sakal
ओरोस: अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वाधिक कुडाळ तालुक्यात १२५ गावे बाधित झाली आहेत. ९ हजार शेतकऱ्यांना याची झळ बसली आहे. दोन हजार ५३४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण तालुक्यातील वराड गावातील कुसरवे येथील संजय चव्हाण यांच्या बाधित झालेल्या शेताची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.