
पाली : रायगड जिल्ह्यात माणगाव, कर्जत व रोहा परिसरात काही ठिकाणी कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी भातशेती केली जाते. हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्य मशागत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी भात शेती मधून शेतकऱ्यांना हुकमी पिक व उत्पन्न मिळते. मात्र अवकाळी पावसामुळे हे हुकमी पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. येथील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.