

Firefighters responding to an emergency highlight the growing pressure on fire services amid rapid urbanisation.
sakal
रत्नागिरी : हा औद्योगिक, व्यापारी व प्रशासकीयदृष्ट्या वेगाने विस्तारत असलेला जिल्हा आहे. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये आहेत. जिल्ह्यात औद्योगिक वसाहती वाढत आहेत. जिल्ह्यातील शहरांचा विस्तार होत असून, बहुमजली इमारती उभ्या राहत आहेत. मुख्य बाजारपेठेत दाटीवाटीच्या ठिकाणी व्यापारी संकुले आहेत.