बांबूपासून बनणार उदबत्तीच्या काड्या, कृषी विद्यापीठाचे संशोधन; कोकणवासीयांना होणार फायदा

use of bamboo business for kokan people research of agricultural universities in ratnagiri
use of bamboo business for kokan people research of agricultural universities in ratnagiri
Updated on

दाभोळ(रत्नागिरी) : कोकणातील बांबू प्रजातीच्या प्रक्रिया संशोधनावर भर देऊन उद्योगनिर्मिती करण्याचे प्रयत्न डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुरू केले असून कोकणवासीयांना बांबू, कळक विकून फारसा फायदा होत नाही, हे लक्षात घेऊन जर उदबत्तीच्या काडीसाठी या बांबूचा उपयोग केल्यास जास्त फायदा होईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.  

सध्या भारतात ७०० कोटींच्या अगरबत्ती काड्या चीन व व्हिएतनाम या देशातून आयात केल्या जात आहेत. आपल्या देशाची मागणी आपणच पूर्ण करण्यासाठी वनशास्त्र महाविद्यालय, दापोली येथे २०२० मध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन हाती घेतले आहे. 
स्थानिक बांबूच्या प्रजातीपासून काड्या काढण्यासाठी मशिनरी खरेदी करण्यात आल्या असून त्यासाठी बांबू हॅण्ड स्प्लीटर, बांबू स्टीक मेकिंग, बांबू स्टीक सिझनिंग मशिन, अगरबत्ती मसाला ॲप्लीयर, अगरबत्ती मसाला मिक्‍सर, बांबू क्रॉस कटिंग मशिन या मशिनचा वापर करण्यात येत आहे.

मानगा व मेष बांबूच्या प्रजातीच्या काड्या तयार करुन त्याच्या वापराकरिता आयटीसी कंपनीकडून (मंगलदीप अगरबत्ती) चाचणी करण्यात आली. या काड्यांचा दर्जा उत्तम असल्याचे सिद्ध झाले असून आयटीसी कंपनीकडून या काड्यांची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या कार्यानुभव अभ्यासक्रमामध्येसुद्धा या प्रशिक्षणाचा समावेश करण्यात येणार आहे. अगरबत्ती निर्मिती व काडी निर्मिती या प्रकल्पाकरिता शिक्षण संचालक, डॉ. सतीश नारखेडे यांनी केंद्र सरकारमधून निधी उपलब्ध करुन देण्यास मदत केली. 

अत्तर व मसाला

वनशास्त्र महाविद्यालयातील शास्त्रज्ञ डॉ. अजय राणे, डॉ. व्ही. डी. त्रिपाठी, वनशास्त्र महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता, डॉ. मुराद बुरोंडकर यांनी शास्त्रीय अभ्यास करुन काडयांना अत्तर व मसाला लावून वनशास्त्र महाविद्यालयाने पहिल्यांदाच हाती घेतलेल्या संशोधनातून खनावाची अगरबत्ती काडी तयार केली आहे. या अगरबत्तीचे उद्‌घाटन स्त्री शक्तीचा आदर करणारा दिवस म्हणजे ८ मार्च २०२१ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. सौ. इंदू सावंत, माजी संचालक, (एनआरसी ) यांच्या हस्ते करण्यात आले. 

प्रशिक्षण, मार्गदर्शन

भविष्यात या व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या लाभार्थींना वनशास्त्र महाविद्यालय, दापोली यांच्याकडून अगरबत्ती काड्या निर्माण करण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  हा प्रकल्प संशोधन संचालकांच्या मार्फत परिभ्रमण निधीतून उद्योगनिर्मितीसाठी चालविण्यात येणार आहे. 

एक नजर..

  • स्थानिक बांबूच्या प्रजातीपासून काड्या काढणार
  •  काड्या काढण्यासाठी केली मशिनरी खरेदी 
  • आयटीसी कंपनीकडून (मंगलदीप अगरबत्ती) चाचणी 
  • या काड्यांचा दर्जा उत्तम असल्याचे सिद्ध 
  • वनशास्त्र कॉलेजने पहिल्यांदाच हाती घेतले संशोधन
  • खनावाची अगरबत्ती काडी केली तयार

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com