साखरप्याच्या पुरुषोत्तम जाधवची कमाल : पूर्ण स्वदेशी पार्टचा वापर करुन त्याने घरीच बनवला ड्रोन

अमित पंडित
Tuesday, 21 July 2020

लॉकडाऊनच्या वेळेचा उपयोग करत त्याने घरीच तयार केला ड्रोन..

 साखरपा  : लॉकडाऊनमधे काय करायचे हा प्रश्न बहुतेकांना सतावत असताना साखरपा येथील एका युवकाने घराच्याघरी ड्रोन तयार करत कमाल केली आहे. संपूर्ण स्वदेशी पार्ट वापरून त्याने हा ड्रोन तयार केला आहे.

 

पुरुषोत्तम कुमार जाधव हा साखरपा जाधववाडी इथे रहाणारा 32 वर्षांचा तरुण. 12वी नंतर ITI शिक्षण पूर्ण करून तो आता वसई इथे एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे पुरुषोत्तम गावी आला आहे.

 हेही वाचा- रत्नागिरीत आणखी ८ जणांना कोरोनाची बाधा.... -

पुरुषोत्तमला लहानपणापासून इलेक्ट्रॉनिकची आवड असल्यामुळे त्याने ह्या लॉकडाऊन काळात काही वेगळे करण्याचा ध्यास घेतला. youtube वर त्याने ड्रोन तयार करण्याचे व्हिडिओ पाहिले, गूगलवर अन्य माहिती मिळवली आणि तो ड्रोन तयार करण्याच्या प्रयत्नाला लागला. अहमदाबाद येथून त्याने लागणारे पार्ट मागवले. महत्वाचे म्हणजे चिनी बनावटीचे स्वस्त पार्ट उपलब्ध असताना पुरुषोत्तम याने स्वदेशी पार्टना प्राधान्य दिले. हे पार्ट उपलब्ध झाल्यावर अवघ्या पंधरा दिवसात त्याने हा ड्रोन तयार केला.

हेही वाचा- छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबाबत सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणाले... -

सध्या हा ड्रोन 200 मीटर उंच जाऊ शकतो. तो तयार करण्यासाठी 22 हजार एवढा खर्च आला आहे. लवकरच ह्या ड्रोनवर कमेरा बसवण्याचा पुरुषोत्तम याचा प्रयत्न आहे.

भविष्यात ह्या ड्रोनचा उपयोग परीसरावर नजर ठेवण्यासाठी होऊ शकतो -

पुरुषोत्तम जाधव 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Using his lockdown time he built a drone at home