esakal | दहा हजाराचे डोस मिळाले, तेही फक्त तीन दिवसांसाठी; रत्नागिरीतील परिस्थिती

बोलून बातमी शोधा

दहा हजाराचे डोस मिळाले, तेही फक्त तीन दिवसांसाठी; रत्नागिरीतील परिस्थिती
दहा हजाराचे डोस मिळाले, तेही फक्त तीन दिवसांसाठी; रत्नागिरीतील परिस्थिती
sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे अनेक नागरिक लसीकरणासाठी पुढे सरसावले आहेत; मात्र पुरेशी लस उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील 30 केंद्रांवरच लस दिली जात आहे. सोमवारी (19) रात्री कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्डचे मिळून 10 हजार 830 डोस प्राप्त झाल्यामुळे दिलासा मिळाला असला तरीही तो तात्पुरताच आहे. हा साठा जास्तीत जास्त तीनच दिवस पुरणार आहे.

दोन दिवसांपुवी प्राप्त झालेले पाच हजार डोसचे प्रमुख केंद्रांवर वितरण करण्यात आले. कोरोना वाढत असल्याने लस घेण्यासाठी केंद्रांवर प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे प्राप्त झालेले डोस एखाद दुसरा दिवस पुरतात. साठा नसल्याने केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येते. सोमवारी दिवसभरात 3 हजार 440 जणांना लस देण्यात आली. एकुण 1 लाख 23 हजार 027 लोकांनी लस घेतली. त्यात पहिला डोस 1 लाख 6 हजार 256 तर दुसरा डोस 16 हजार 571 जणांनी घेतला.

जिल्ह्यात 112 केंद्र निश्‍चित केली आहेत; मात्र अपुर्‍या साठ्यामुळे 39 केंद्रांवरच लसीकरण सुरु आहे. काल रात्री उशिरा कोव्हॅक्सीनचे 5 हजार 830 तर कोविशिल्डचे 5 हजार डोस जिल्ह्याला मिळाले आहेत. मंगळवारी दिवसभर त्याचे वितरण सुरु असून उद्यापासून पुन्हा सर्व केंद्रात लस दिली जाईल. हा साठा पुढे तिनच दिवस पुरणार आहे. त्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती ओढवणार आहे. सध्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय आणि मोजकी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस दिली जात आहे.

चार दिवसांनी लसीकरण थांबते

शासनाने 18 वर्षांखालिल लोकांना लस द्या, असे आदेश काढले आहेत; मात्र पुरेशी लस जिल्ह्यात उपलब्ध होत नसल्याने या आदेशाचा बोजवारा उडणार आहे. दर चार दिवसांनी मात्रा कमी असल्याने लसीकरण थांबवावे लागते. उपलब्ध असेल तिथेच लस देण्याची कार्यवाही सुरु राहते. यामुळे नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे