esakal | सिंधुदुर्गात लस येणार कधी?
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination campaign waiting konkan sindhudurg

दरम्यान, या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""सिंधुदुर्गसाठीची लस कोल्हापूर येथे आल्याचे येथे समजले आहे, पण ती कशी आणि कधी आणायची यासंदर्भात कोणत्याही सूचना आमच्यापर्यंत आलेल्या नाहीत. त्या आल्यानंतर तातडीने पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल.'' 

सिंधुदुर्गात लस येणार कधी?

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचे डोस राज्यातील बहुतांश जिल्ह्यात बुधवारी दाखल झाले; मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात लस कधी येणार याबाबत रात्री उशीरापर्यंत स्पष्टता नव्हती. सिंधुदुर्गासाठीची लस कोल्हापूरच्या वितरण केंद्रावर आली असल्याचे समजते. कोरोना प्रतिबंधासाठीचे लसीकरण येत्या शनिवार (ता. 16) पासून सुरू होणार आहे. 

दरम्यान, या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""सिंधुदुर्गसाठीची लस कोल्हापूर येथे आल्याचे येथे समजले आहे, पण ती कशी आणि कधी आणायची यासंदर्भात कोणत्याही सूचना आमच्यापर्यंत आलेल्या नाहीत. त्या आल्यानंतर तातडीने पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल.'' 

पहिल्या टप्प्यात कोरोना योद्‌ध्यांना लस टोचण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. एका केंद्रावर कमीत कमी शंभर लाभार्थ्यांना लसीकरण होणार आहे. त्यासाठी आशा व वैद्यकीय कर्मचारीवर्गाने यापूर्वी केलेल्या सर्व्हेचा आधार घेतला जाईल. यात गेल्या आठ महिन्यांत शासकीय स्तरावर कोरोनायोद्धा म्हणून काम केलेल्या वैद्यकीय कर्मचारी, डॉक्‍टर यांना प्राधान्याने लस देण्यात येईल. त्यासोबत विविध शासकीय विभागातील कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनाही लसीकरणाचा लाभ देण्यात येणार आहे. 

पहिल्या टप्प्यात 7557 जणांचे लसीकरण 

ओरोस - कोरोनाला प्रतिबंधक लस जिल्ह्यात पहिल्या टप्यात अति जोखमीच्या सात हजार 557 जणांना देण्यात येणार आहे. ती तीन 
टप्प्यात दिली जाणार आहे. जिल्ह्याला साडेदहा हजार डोस मंजूर आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुसज्ज शीतगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. अडीज लाख लोकांना पुरेल, असा लस साठा या शीतगृहात एकाच वेळी करता येणार आहे. 

पहिल्या टप्प्यात जोखमीच्या लोकांना लस टोचण्यात येणार आहे. यात डॉक्‍टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, अधिकारी, आशा 
स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात पोलिस, रेल्वे, एसटी कर्मचारी यांना दिली जाणार आहे. तिसऱ्या 
टप्प्यात उच्च रक्तदाब, मधुमेह व ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना दिली जाणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषद प्रशासनाने लस साठवणुकीसाठी लागणाऱ्या शीतगृहाची जय्यत तयारी केली आहे.

जिल्हा रुग्णालयात एक मोठे शीतगृह आहे. उपजिल्हा रुग्णालयात तीन, ग्रामीण रुग्णालयात आठ व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 34 अशा प्रकारे एकूण 46 शीतगृहे सुसज्ज स्थितीत आहेत. लस जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाल्यानंतर तालुका स्तरावर सुपूर्द केली जाणार आहे. यासाठी लागणारे वाहन देखील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे. या वाहनातून सर्व लसीचा पुरवठा तालुक्‍याच्या ठिकाणी केला जाणार आहे. या शीतगृहात अडीज लाख लोकांना पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे. 

संपादन - राहुल पाटील