esakal | Vaccination Update: तीन दिवसांची मोहिम यशस्वी; 6 हजार 572 जणांचे लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

Vaccination Update: रत्नागिरीत तीन दिवसांची मोहिम यशस्वी

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) विधानसभा मतदारसंघामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या पुढाकारातून गेली तीन दिवस सुरू असलेली लसीकरणाच्या (vaccination)मोहिम आज संपली. यामध्ये ६ हजार ५७२ जणाचे लसीकरण करण्यात आले. स्वामी समर्थ मंगल कार्यालयात १ हजार ७५५ तर सर्वांत कमी ५०८ जणांचे लसीकरण मिरकरवाडा केंद्रावर (Mirakwada Center) झाले.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे सुरक्षित लसीकरण होणे आवश्यक होते. कोरोना संसर्ग रोखायचा असले तर योग्य खबरदारी व लसीकरण हेच दोन प्रभावी मार्ग आहेत. जास्तीत जास्त नागरिकांचे जलद गतीने लसीकरण व्हावे, या उद्देशाने मंत्री उदय सामंत यांनी ही तीन दिवसाची लसीकरण मोहिम हाती घेतली.

उदय सामंत यांच्या पुढाकाराने रत्नागिरीत पाच ठिकाणी हे लसीकरण झाले. याचे सर्व नियोजन युवा सेनेकडे दिले होते. अतिशय सुटसुटीत आणि नियोजनबद्ध हे लसीकरण झाले. शहरातील साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय, माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालय, आठवडा बाजार येथील केतन मंगल कार्यालय, खालची आळी येथील भैरव मंगल कार्यालय, मिरकरवाडा येथील पालिकेची शाळा क्रमांक १० या पाच ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ७ ते ९ जुलै या कालावधीत ही मोहीम सुरू होती. यामध्ये १८ ते २९ वयोगटातील तरुण, तरुणींचे लसीकरण करण्यात आले.

हेही वाचा- भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्षपद मिळणार ?

पहिल्याच दिवशी बुधवारी (ता. ७) पाचही केंद्रांवर १ हजार ७९९, आठ तारखेला २ हजार ४४८ नऊ तारखेला २ हजार ३२५ अशा प्रकारे तीन दिवसात ६ हजार ५ ७२ जणांचे लसीकरण करण्यात आले. आपल्या मतदरासंघातील मतदरांना सुलभ लसीकरण होण्यासाठी मंत्री सामंत यांनी हा उपक्रम हाती घेतला. महाराष्ट्रातील हा पहिल्या उपक्रम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून नोंदणी घेऊन, ज्या केंद्रावर जेवढे डोस उपलब्ध होते. तेवढ्याच लोकांना फोन करून बोलावून घेतले जात होते. त्यामुळे कोणतीही गर्दी न होता सुटसुटीत पद्धतीने हा लसीकरणाचा कार्यक्रम झाला.

पहिल्या दिवशी पाचही केंद्रांवर १ हजार ७९९

दुसऱ्या दिवशी २ हजार ४४८

तिसऱ्या दिवशी २ हजार ३२५

एकूण- ६ हजार ५ ७२ जणांचे लसीकरण

loading image