esakal | भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्षपद मिळणार ?
sakal

बोलून बातमी शोधा

भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्षपद मिळणार ?

भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्षपद मिळणार ?

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण : महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकवायचे असेल तर भास्कर जाधवांना (bhaskar jadhav) विधानसभेचे (assembaly) अध्यक्ष करण्यावर महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. (mahavikas aghadi sarkar) शिवसेनेकडील वनमंत्रीपद कॉंग्रेसला सोडून कॉंग्रेसने विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला द्यावे, (shivsena) असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भास्कर जाधवांच्या गळ्यात लवकरच विधानसभा अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

विधानसभेचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे (congress) आहे. कॉंग्रेसचे नाना पटोळे (nana patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले. पावसाळी अधिवेशनाला सामोरे जाण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये चिंतेचे वातावरण होते. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी अधिवेशनात सरकारला घेरण्याची पुरेपूर तयारी केली होती.

हेही वाचा: सारथीबाबतच्या मागण्या सरकारने लवकर पूर्ण कराव्यात : संभाजीराजे

अधिवेशनात एक दिवस अगोदर कॅबिनेटची बैठक झाली. त्यात भास्कर जाधव यांना तालिका समितीचे अध्यक्ष करून अधिवेशनाला सामोरे जाण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आला. मागील अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे प्रकरणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा आमदार भास्कर जाधव यांनीच सरकारची बाजू मांडली होती. त्यामुळे याही अधिवेशनात भास्कर जाधव यांना अध्यक्ष करण्यावर महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे एकमत झाले.

अध्यक्ष म्हणून काम करताना भास्कर जाधवांनी दोन्ही दिवस गाजवले. 20 हजार कोटीचे पुरवणी बजेट मंजूर केले. सभागृहात गोंधळ घालणारे आणि तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांचे त्यांनी निलंबित केले. 9 विधेयके मंजूर केली. विरोधीपक्ष सभागृहात नाही म्हणून कोणताही कायदा मंजूर होणार नाही. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सभागृहात कायद्याची माहिती द्यावी नव्या सदस्यांसह सर्वांना त्याची माहिती होईल नंतरच तो कायदा मंजूर केला जाईल, अशी अट त्यांनी सरकारसमोर ठेवली होती.

हेही वाचा: स्पर्धा परीक्षेला राम राम ठोकत शेखरने गाव गाठलं अन् झाला कोट्याधीश

कृषी, मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सरकारने केलेले ठराव अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांनी मंजूर केले. भाजपचे राज्यातील नेते केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणेचा वापर करून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व आमदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे असताना जाधव भाजपच्या नेत्यांना खुलेआम अंगावर घेत आहेत. त्यामुळे त्यांनाच अध्यक्ष करून महाविकास आघाडी सरकार पुढील पाच वर्ष चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

"सरकार टिकवणे तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे. शिवसेनेकडचे मंत्रीपद कॉंग्रेसला सोडून त्याऐवजी विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला देणे म्हणजे सरकार टिकवण्याची जबाबदारी शिवसेनेवर येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसबरोबर कोणत्याही वाटाघाटी न करता विधानसभा अध्यक्षपद दिले तर ते स्विकारण्याची माझी तयारी आहे."

- भास्कर जाधव, आमदार गुहागर

loading image