राजकीय दहशत पुन्हा मोडीत काढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

कणकवली - बंदोबस्तावरील पोलिसांना शिवीगाळ करून माजी खासदार नीलेश राणे यांनी संस्कृती दाखवून दिली आहे. त्यांची ही राजकीय दहशतीची प्रवृत्ती लोकसभा निवडणुकीत जनता पुन्हा मोडीत काढेल, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी येथे दिला.

कणकवली - बंदोबस्तावरील पोलिसांना शिवीगाळ करून माजी खासदार नीलेश राणे यांनी संस्कृती दाखवून दिली आहे. त्यांची ही राजकीय दहशतीची प्रवृत्ती लोकसभा निवडणुकीत जनता पुन्हा मोडीत काढेल, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी येथे दिला.

येथील विजय भवनमध्ये आमदार नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘राणेंनी निष्ठावंत शिवसैनिकांची मुळीच काळजी करू नये. ते सदैव शिवसेनेसोबत आहेत. खरी काळजी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी करावी. लोकसभा निवडणूक निकालानंतर त्यांचे काय होईल, याची चिंता त्यांना सतावते आहे.

बंदोबस्तावरील पोलिसांनाच शिवीगाळ आणि दमदाटी करण्याचा प्रकार योग्य नाही. सत्ता, संपत्ती आणि दहशतीचा वापर करून सिंधुदुर्गात सत्ता मिळविली होती; पण मागच्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा गेली साडेचार वर्षे शांत होता; मात्र विरोधात पुन्हा मतदारसंघात अशांतता निर्माण करू पाहत आहेत; पण या लोकसभा निवडणुकीतही रत्नागिरी-सिंधुदुर्गची जनता निश्‍चितपणे चोख उत्तर देईल.’

नंतरच इतरांना उपदेश करा 
निवडणूक प्रचारादरम्यान राणेंकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांचे शिक्षण, इंग्रजी भाषेबद्दलचे ज्ञान याबाबत अपप्रचार केला जातोय; पण आपण काय करतोय याचा विचार त्यांनी आधी करावा आणि नंतरच इतरांना उपदेश करावा, असा टोलाही श्री. नाईक यांनी हाणला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaibhav Naik comment