esakal | पिंडीवर सोमवारी जेव्हा खरेखुरे नागराज अवतरतात
sakal

बोलून बातमी शोधा

vaibhavwadi are one snake found in shivling temple in kokan crowd of people to see snake

शकंराच्या मंदीरात शंकराच्या डोक्यावर फणाधारी नागाची प्रतिकृती प्रत्येक मंदीरात पाहायला मिळते. परंतु अशाच एकाच छोट्याश्‍या मंदीरातील पिंडीवर फणाधारी नाग आज लोकांना पाहायला मिळाला.

पिंडीवर सोमवारी जेव्हा खरेखुरे नागराज अवतरतात

sakal_logo
By
एकनाथ पवार

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : वैभववाडी-तळेरे मार्गावरील कोकिसरे नारकरवाडी येथील शकंराच्या पिंडीवर खराखुरा नाग फणा काढुन बसल्यामुळे तो लोकांमध्ये कुतुहलाचा विषय ठरला आहे. ही माहीती बाजारपेठेसह आजुबाजुच्या परिसरात पसरताच नागाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. त्यामुळे तालुक्यात हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 

कोकणात विविध देवतांची मंदीरे पाहायला मिळतात. गावागावांत ग्रामदैवतांप्रमाणे गणेशमंदीर, दत्तमंदीर, हनुमान मंदीर, राममंदीरांसह अनेक देवतांची मंदीरे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे शंकरांची मंदीरे देखील मोठ्या प्रमाणात आहे. अनेक गावांमध्ये शकंराच्या विविध रूपांची प्रतिनिधीक स्वरूपात मंदीरे आहेत. शकंराच्या मंदीरात शंकराच्या डोक्यावर फणाधारी नागाची प्रतिकृती प्रत्येक मंदीरात पाहायला मिळते. परंतु अशाच एकाच छोट्याश्‍या मंदीरातील पिंडीवर फणाधारी नाग आज लोकांना पाहायला मिळाला.

हेही वाचा - रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा ; आकांक्षा साळवी देशात प्रथम

वैभववाडी पासुन पाचशे मीटर अतंरावर रस्त्याकडेला शंकराचे एक लहान मंदीर आहे. तात्या मोहीते यांनी काही वर्षांपुर्वी हे मंदीर बांधले. या मंदीरात महामार्गावरून ये-जा करणारे अनेक वाहनचालक श्रीफळ देवुन पुढल्या प्रवासाला जातात. याशिवाय दर सोमवारी काही लोक मंदीरात जाऊन दर्शन घेतात. आज बाजारपेठेतील एक हॉटेल व्यावसायीक आज सायकांळी चार वाजण्याच्या सुमारास या मंदीरात गेला. त्याने मुख्यपिंडीसमोर श्रीफळ दिले आणि बाजुला असलेल्या पिंडीकडे गेला. तेथील स्थिती पाहुन तो भारावुन गेला. त्याला शकंराच्या पिंडीवर एक लहान फणाधारी नाग बसल्याचे दिसले. त्याने त्या नागराजाचे दुरूनच दर्शन घेतले.  

शंकराच्या पिंडीवर खराखुरा नाग असल्याची माहीती अवघ्या तासाभरात बाजारपेठेसह आजुबाजुच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यातच वैभववाडी-तळेरे मार्गावर हे देवस्थान असल्यामुळे ये-जा करणाऱ्यांची  वर्दळ येथे असते. यावेळी शेकडो लोक मंदीर परिसरात जमा झाले. त्यातील अनेकांनी त्याचे दुरूनच दर्शन घेतले. जशीजशी ही बातमी लोकांपर्यत पसरत होती तसतसे लोक नागाला पाहण्यासाठी मंदीराकडे येत होते. सांयकांळी उशिरापर्यत ही गर्दी दिसत होती. तर काही लोक कुतुहल म्हणुन पाहायला येत होते. 

हेही वाचा - कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी कौशल्याची झलक दिसणार ; नेपाळमध्ये डेमू ट्रेन धावणार 

संपादन - स्नेहल कदम