Sindhudurg ST Bus Accident : सिंधुदुर्गात थरारक अपघात; अरुणा धरणाजवळ मातीचा भराव ओलांडून थेट 200 फूट खोल दरीत कोसळली एसटी बस, 13 प्रवासी जखमी

Aruna Dam Near ST Bus Accident in Vaibhavwadi : अरुणा धरणाजवळ फोंडा-मौदे एसटी बस २०० फूट खोल दरीत कोसळली. बस पाण्यापासून काही अंतरावर थांबल्याने मोठा अनर्थ टळला. चालकासह प्रवासी जखमी झाले.
Aruna Dam Bus Accident

Aruna Dam Bus Accident

esakal

Updated on

वैभववाडी : कणकवली तालुक्यातील फोंडा (ता. कणकवली) येथून मौदे (ता. वैभववाडी) येथे जाणारी एसटी बस साडेचार फूट उंचीचा मातीचा भराव ओलांडून अरुणा धरण प्रकल्पाच्या २०० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने धरणाच्या पाण्यापासून अवघ्या २० फुटांवर बस थांबल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १८) रात्री आठच्या सुमारास (Sindhudurg ST Bus Accident) घडली. अपघातात चालक युवराज पाटील जखमी झाले. बसमधील वाहकासह १३ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com