Vaibhavwadi Crime News
esakal
वैभववाडी : कुसूर-पिंपळवाडी येथील सचिन महादेव सावंत (वय ४०) यांनी आज सोनाळी इनामत व्हाळ येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सावंत हे गेल्या काही वर्षांपासून वैभववाडीत (Vaibhavwadi) संकल्प फोटो स्टुडिओ चालवित होते. या प्रकरणाची नोंद येथील पोलिस ठाण्यात झाली आहे.