वैभववाडी तालुक्यात दोन ग्रामपंचायतीवर स्वाभिमानचा झेंडा

एकनाथ पवार
सोमवार, 25 मार्च 2019

वैभववाडी - तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत दोन ग्रामपंचायतीवर स्वाभिमानने तर भाजपने एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. चुरशीची ठरलेली कुसुर ग्रामपंचायतीवर स्वाभिमानने एकतर्फी विजय मिळविला.

वैभववाडी - तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत दोन ग्रामपंचायतीवर स्वाभिमानने तर भाजपने एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. चुरशीची ठरलेली कुसुर ग्रामपंचायतीवर स्वाभिमानने एकतर्फी विजय मिळविला. निवडणुक निकालानतंर फटाक्याची आतषबाजी करीत कार्यकर्त्यानी जोरदार जल्लोष केला.

तालुक्यातील आखवणे - भोम, तिरवडे तर्फे सौदळ, कुसुर आणि मौदे ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले होते. यातील मौदे ग्रामपंचायतीच्या एका सदस्यांसाठी निवडणुक झाली. आज सकाळी येथील तहसिल कार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली.

तिरवडेत भाजपच्या मनिषा घागरे सरपंचपदी

तिरवडे तर्फे सौंदळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या मनिषा मनोहर घागरे अवघ्या दहा मतांनी विजयी झाल्या. त्यांनी मानसी खानविलकर यांचा पराभव केला.

आखवणे-भोम सरपचपदी आर्या कांबळे

आखवणे-भोम ग्रामपंचायतीच्या सरपंचपद निवडणुकीत स्वाभिमान पक्षाच्या आर्या अरूण कांबळे विजयी झाल्या. त्यांनी सुनंदा सुरेश जाधव यांचा पराभव केला.

कुसुरच्या सरपंचपदी शिल्पा पाटील

तालुक्याचे लक्ष वेधुन घेतलेल्या कुसुर ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत स्वाभिमानच्या शिल्पा शिवाजी पाटील विजयी झाल्या. त्यांना ५०९ मते मिळाली.  त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेद्‌वार स्मिता संतोष पाटील यांना ३४९ मते मिळाली. 

ग्रामपंचायत निहाय विजयी उमेदवार

आखवणे-भोम ग्रामपंचायत -

स्मिता संतोष नागप- १३२ मते, आकाराम यशवंत नागप - १४४ मते, संतोष मोहन पांचाळ - १०८ मते,  वनिता विनोद जांभळे - १५० मते 

मौदे ग्रामपंचायत विजयी उमेदवार

विजय मोतीराम मोरे   

तिरवडे तर्फे सौदळ विजयी उमेदवार

अशोक पांडुरंग घागरे 

कुसुर ग्रामपंचायत विजयी उमेदवार

वर्षा विलास पाष्टे - १९३ मते

नितीन शांताराम कुळये - १६० मते

आकाराम विष्णु सांवत - १५० मते

सारीका गोपाळ जाधव -२५० मते

सत्यवती भिवाजी पाटील - १६४  मते 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaibhavwadi Taluka Grampanchayat election