esakal | रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा 'तो' मेसेज फेकच!
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा 'तो' मेसेज फेकच!

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा 'तो' मेसेज फेकच!

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली, अर्जुन संकपाळ रत्नागिचे नवे जिल्हाधिकारी, अशी बातमी काल सोशल मीडियावर व्हायरल झाली. उपसचिव स. री. बांदेकर देशमुख यांच्या नाव ती बातमी फिरत होती. मात्र हे पत्र आणि बातमी 'फेक' आहे. जिल्ह्यातील कोरोना संपत नाही, तोपर्यंत मी जिल्ह्यातून जाणार नाही, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण केल्यामुळे या विषयावर पडदा पडला आहे.

जिल्हाधिकारी यांची बदली झाल्याचे बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महसूल विभागात जोरदार चर्चा सुरू झाली. लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या जागी अर्जुन संकपाळ हे नवे जिल्हाधिकारी असतील अशी बातमी रविवारी सोशल मीडियावर फिरत होती. शासनाचे उपसचिव स. री. बांदेकर देशमुख यांच्या नावे ती बातमी फिरली. मात्र काही क्षणातच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत खुलासा करत ही बातमी फेक असल्याचे स्पष्ट केले. जोपर्यंत जिल्ह्यातील कोरोना संपत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातून जाणार नाही, असेही मिश्रा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: चिंताजनक! ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी वैद्यकीय पंढरीचा 'श्‍वास' गुदमरतोय

जिल्हाधाकरी मिश्रा यांनी 14 फेब्रुवारी 2020 ला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारला. तत्पूर्वी 3 वर्षे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले होते. कौटुंबिक अडचणीमुळे त्यांनी फेब्रुवारीमध्ये पुण्यात बदली मागितली होती. मात्र कोरांनामुळे हा विषय मागे पडला.

बदली प्रकरणी सखोल चौकशी करा : नातू

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असे पत्र भाजपचे उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या आणि त्या रद्द करण्यासाठी केले जाणारे अनेक प्रकार यामुळे अण्णा हजारे यांच्या उपोषणानंतर बदली नियमाचा कायदा करण्यात आला आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांनी कोणत्या विषयावर प्रसिद्धी माध्यमांजवळ बोलावे व कोणत्या विषयाबाबत प्रसिद्धी माध्यमाजवळ बोलू नये, याकरीता नोकरीमधील प्रशाकीय अधिकार्‍यांसाठी नियमावली निश्‍चित केली आहे. जिल्हाधिकार्‍यांची बदली होणे व ती रद्द होणे या विषयाबाबत अनेक नियमांची पायमल्ली झाली आहे. सचिव किंवा आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांकडुन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे, असे नातू यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा: मोहित्यांच्या वडगावात 95 वर्षीय आजीने कोरोनाला केले चितपट

loading image
go to top