esakal | चिंताजनक! ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी वैद्यकीय पंढरीचा 'श्‍वास' गुदमरतोय

बोलून बातमी शोधा

null
चिंताजनक! ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी वैद्यकीय पंढरीचा 'श्‍वास' गुदमरतोय
sakal_logo
By
शंकर भोसले

मिरज : वैद्यकीय पंढरी मिरजेत कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवताना प्रचंड कसरत सुरु झालीय. मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण झाल्याने आता या वैद्यकीय पंढरीचा श्‍वास गुदमरू लागला आहे. रुग्णांना दाखल करून घेण्यास रुग्णालये असमर्थता दर्शवत आहेत. पहिल्या लाटेत मिरजेतील रुग्णालयांनी अतिशय चांगली सेवा दिली.

सोलापूर, कोल्हापूरसह बाजूच्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांची दाखल होण्याची संख्या मोठी आहे. साऱ्याचा ताण सहन करत वैद्यकीय पंढरी काम करीत आहे. आतापर्यंत पुरेसा ऑक्सिजन होता. मात्र रुग्णसंख्या वाढत असताना तुटवडा जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी अत्यावश्‍यक रुग्णांना ऑक्सिजनमुळे दाखल करून घेणे बंद केले आहे. जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयातदेखिल हीच स्थिती आहे. ऑक्सिजन बेड पूर्ण क्षमतेने आरक्षित झालेत.

हेही वाचा: सांगली महापालिका हद्दीत बुधवारपासून जनता कर्फ्यू; जीवनावश्‍यक सेवा सकाळी 11 पर्यंतच

मिरज शासकीय कोविड रुग्णालयासह १० दहा रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा भासू शकतो. वेळेत पुरवठा करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील रुग्णांचा या ठिकाणी ताण अधिक प्रमाणात आहे. अल्प खर्चात उपचार होत असल्याने हे रुग्णालय सोयीचे बनले आहे. या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तब्बल दहा खासगी रुग्णालयांत हीच स्थिती निर्माण झाली आहे.

दहा रुग्णालयांत सोय

मिरजेत शासकीय रुग्णालय, सिनर्जी, सेवासदन, वॉन्लेस, अॅपेक्स केअर, शिवकृपा, जिल्हा क्रीडा संकुल, शासकीय तंत्रनिकेतन, हेल्थ पॉईंट मल्टीस्पेशालिटी, मिरज फिजीशीयन ग्रुप, चव्हाण रुग्णालय येथे सेंटर सुरु आहेत. ऑक्सिजनआभावी रुग्णालयाबाहेर विना ऑक्सिजन बेड असा फलक लावावा लागत आहे. दिल्ली सारखी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे मत एका खासगी कोव्हिड सेंटर मधील तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.

हेही वाचा: धक्कादायक! सांगलीत कोरोना बाधिताच्या घरावर हल्ला; 7 जणांवर गुन्हा

अनर्थ घडण्यापूर्वी काळीज घ्या

या क्षेत्रातील काही डॉक्टरांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर माहिती दिली, की प्रशासन आणि राज्यकर्त्यांनी सांगली-मिरजेला होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबत वेळीच गांभीर्याने घेतले नाही तर अनर्थ होऊ शकतो. त्यांचा हा इशारा प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.