Gram Panchayat Results : वीस वर्षे वसोली ग्रामपंचायतीत असलेला भाजपचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात

अजय सावंत
Monday, 18 January 2021

चिट्टी पध्द्तीने शिवसेनेचा उमेदवार विजयी  मात्र ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात 

 कुडाळ (सिंधुदुर्ग): कुडाळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायत निवडणूक मध्ये आज झालेल्या मतमोजणीत 9 जागापैकी 5 जागांवर शिवनेनेने भगवा फडकवला. 4 जागांवर भारतीय जनता पार्टीला समाधान मानावे लागले .

भाजपचे माजी सभापती मोहन सावंत यांच्या ताब्यात गेली 20 वर्षे असणारी वसोली ग्रामपंचायत यावेळी संपूर्ण शिवसेनेच्या ताब्यात आली. कुपवाडेमध्ये शिवसेना व भाजपाच्या एका जागेवर उमेदवार याची मतमोजणी बरोबरीत झाल्याने तेथे चिट्टी पध्द्तीने शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला; मात्र ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली.

हेही वाचा- बंडखोरांना धोबीपछाड करत शिवसेनेची सत्ता कायम राखली

हेही वाचा- Gram Panchayat Results : गाव करील ते राव काय करील: चंद्रकांत पाटील यांना स्वतःच्या गावातच मोठा धक्का -

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vasoli kudal Gram Panchayat Results sindhudurg political news