पडीक जमिनीवर फिरला नांगर, पिकल `सोनं`, वाचा कष्टकऱ्यांची कहाणी

vegetable planting on fallow land in kudal sindhudurg
vegetable planting on fallow land in kudal sindhudurg

कुडाळ (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक शेतीची संकल्पना रुजवली आहे. आंबडपाल आणि येथील एमआयडीसी गणेशवाडी येथे सूर्यकांत कुंभार, जयराम परब व तानाजी सावंत यांनी एकत्र येऊन काही एकर पड जमिनीवर भाजीचे मळे फुलवले आहेत. ते देखील 100 टक्‍के सेंद्रिय. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन या तरुण शेतकऱ्यांनी गावागावात बेरोजगार असलेल्या तरुणांना एक नवी दिशा दाखवली आहे. 

गेले सहा महिन्यात लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडेच मोडले आहे. अनेक जणांना उद्योगधंदे बंद करावे लागले. बऱ्याच जणांना नोकरीवर पाणी सोडावे लागले. मोलमजुरी करणाऱ्यांचे रोजगार बुडाले. अशा कठीण परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी नेमके करायचे काय? असा प्रश्‍न अनेकांना पडला. नेमके याच कठीण वेळी अनेकांचे लक्ष वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमीनीकडे गेले. ज्या जमिनीवर अनेक वर्षे कोणी फिरकले नव्हते, तेथे नांगर फिरले. पेरणी झाली आणि आता तर पिकं बऱ्यापैकी डोलत आहे; मात्र यापुढे जाऊन तालुक्‍यातील काही प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक शेतीची संकल्पना रुजवली आहे. 

आंबडपाल आणि कुडाळ एमआयडीसी गणेशवाडी येथे सूर्यकांत कुंभार, जयराम परब व तानाजी सावंत यांनी एकत्र येऊन काही एकर पड जमिनीवर भाजीचे मळे फुलवले आहेत आणि ते देखील 100 टक्‍के सेंद्रिय. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन या तरुण शेतकऱ्यांनी गावागावात बेरोजगार असलेल्या तरुणांना एक नवी दिशा दाखवली आहे. 

एमआयडीसीवरून माड्याच्यावाडीला जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला नजर गेली, तर काही एकरमध्ये भाजीचा मळा पिकविला आहे. याकडे सर्वांचे लक्ष निश्‍चितच वेधून घेईल. यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या मिरच्या, काकडी, शिराळी, भोपळा, दुधी भोपळा, भेंडी, पडवळ, लालपाला भाजी, मुळा भाजी इत्यादी प्रकारची भाजी पहावयास मिळते. या भाजीच्या मळ्यात जाऊन प्रत्यक्ष वेलीवर लागलेली भाजी पाहून त्यातील भाजी खरेदी करण्यातील मजा काही औरच असते. 

भाजीचे दुकानही 
मळ्याच्या बाहेरच त्यांनी ताज्या भाजीचे दुकान देखील थाटलेले आहे. भाजीचे दर हे देखील बाजारभावापेक्षा निश्‍चितच कमी आहेत. विशेष म्हणजे याकरिता वापरण्यात येणारी सर्व बियाणी ही स्थानिकच आहेत. काही वेगळे प्रयोग करण्याकरिता राज्याच्या अन्य भागातील आदिवासी भागातील बियाणी देखील आणून त्याची लागवड केली आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com