प्रेरणादायी! संकटातही शोधलाय जगण्याचा `असा` मार्ग

दीपेश परब
Wednesday, 22 July 2020

महिला समूहाने भाजीपाला उत्पादित केला. यामध्ये मूळा भाजी, लाल भाजी, वाली, दोडका, वांगी, भेंडी तसेच रानभाज्या उपलब्ध केल्या आहेत. हा सेंद्रिय भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत आहे.

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील वेतोरे गाव हे भाजीपाल्याचे गाव अशी ओळख आहे. आज या व्यवसायात पुरुष मोठ्या प्रमाणात शेती करतात; मात्र येथील महिला बचत गटाच्या महिलांनी एकत्रित येत भाजीपाला उत्पादित केला आहे. या भाजीपाल्याला कोरोनामुळे गोवा, रत्नागिरी, कर्नाटक या भागात ताळेबंदी असल्याने बाजारपेठ उपलब्ध नाही.

परिणामी येथील महिलांनी जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्या प्रयत्नाने स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून सेंद्रीय भाजीपाला उत्पादक समुहाचा सेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्राचा प्रारंभ केला. महिला समूहाने भाजीपाला उत्पादित केला. यामध्ये मूळा भाजी, लाल भाजी, वाली, दोडका, वांगी, भेंडी तसेच रानभाज्या उपलब्ध केल्या आहेत. हा सेंद्रिय भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत आहे. त्यामुळे भाजीपाला विक्री केंद्र उद्‌घाटन प्रारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष नाईक यांच्या हस्ते झाला. 

वाचा - कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक कोरोना बाधित.... -

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य समीर नाईक, जिल्हा ग्रामीण यंत्रणा प्रकल्प संचालक दीपक चव्हाण, डी. आर. डी. ए.चे दीपक चव्हाण, जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार, तालुका समन्वयक निलेश जगताप, आरती पाटील, तालुका सेंद्रीय व्यवस्थापक तायय्पा करे, सचिन मोहिते, सेंद्रिय शेती समन्वयक रेखा परूळेकर, ग्रामसेवक भुषण चव्हाण, उत्कर्षा आर आरवंदेकर, योगिता हळदणकर, प्रीती आरोलकर, शुभ्रा रेडकर, विलासिनी नाईक, उर्मिला जाधव, योगिता आजगावकर, उर्मिला नाईक, आरती नाईक, अनामिका गावडे, श्री. वालावलकर आदी उपस्थित होते. सेंद्रीय पध्दतीने भाजीपाला केलेल्या प्रकल्पाची जिल्हा ग्रामीण यंत्रणा प्रकल्प संचालक चव्हाण व जिल्हा परिषद अध्यक्षा नाईक यांनी पहाणी केली. 

हेही वाचा- त्या बैठकीला उपस्थित होते नाईक  : पालकमंत्री उदय सामंतसह वरिष्ठ  अधिकारी यांच्यावर क्वारंटाइनची टांगती तलवार..... -

चर्चासत्राला प्रतिसाद 
कोरोनामुळे अनेकांना व्यवसाय, नोकरी गमवावी लागली आहे. त्यातच मुंबई येथील कळंबोली येथे हे भाजीपाला-आंबा विक्री करणारी गावातील महिलांनी वेतोरे गावी आल्यानंतर बचत गटांच्या मदतीने भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले. उमेद अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाच्यावतीने भरारी प्रभाग संघ आडेली व सखी महिला ग्रामसंघ वेतोरे यांनी संजीवनी सेंद्रीय भाजीपाला उत्पादक समुहाचे वेतोरे-खाबडवाडी येथे चर्चासत्र आयोजित केले होते. त्यालाही प्रतिसाद मिळाला. 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetable sales center in vetore vengurla sindhudurg