कोरोनामुळे `येथील` तहसिल कार्यालय बंद 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

ऐन गणेश चतुर्थीत वेंगुर्लेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. रविवारी (ता.23) आलेल्या अहवालानुसार 12 जण पॉझिटिव्ह आले

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - येथील रहिवासी व तहसिल कार्यालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सॅनिटाईज करण्यासाठी आज तहसिल कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची माहिती तहसिलदार प्रविण लोकरे यांनी दिली. 

ऐन गणेश चतुर्थीत वेंगुर्लेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. रविवारी (ता.23) आलेल्या अहवालानुसार 12 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील 11 जण पहिल्या भाजी व्यापारी यांच्या हायरिस्क संपर्कातील आहेत. शहरातील इतर हायरिस्क संपर्कातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

प्रशासनाकडून आज मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत वेंगुर्ले तालुक्‍यात एकूण 70 व्यक्तीचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यातील 62 रुग्ण सक्रिय आहेत. 8 जण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अश्‍विनी माईणकर यांनी दिली आहे. 

आरोग्य केंद्रात नोंद रुग्णांची संख्या 
                   आढळलेले रुग्ण            सक्रिय रुग्ण 
रेडी........................13 .......................13 
तुळस.....................26..........................21 
परुळे.......................1..........................0 
आडेली.....................2..........................1 
वेंगुर्ले शहर..............28........................27 
एकूण......................70.......................62 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegurle Tahasil Office Close Due To Corona