esakal | सजावटीतून इको फ्रेंडली संदेश; वेंगुर्ले नगराध्यक्षांचा उपक्रम 
sakal

बोलून बातमी शोधा

सजावटीतून इको फ्रेंडली संदेश; वेंगुर्ले नगराध्यक्षांचा उपक्रम 

वेंगुर्ले - नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी आपल्या घरी विराजमान गणेश मूर्तीच्या सभोवती सजावटीसाठी पानांच्या पत्रावळी व द्रोण यांचे इको फ्रेंडली डेकोरेशन केले आहे. "स्वच्छ वेंगुर्ले सुंदर वेंगुर्ले' व याचबरोबर पर्यावरण रक्षणाचा सुंदर संदेश या इको फेंडली सजावटीतून त्यांनी दिला आहे. 

सजावटीतून इको फ्रेंडली संदेश; वेंगुर्ले नगराध्यक्षांचा उपक्रम 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले - नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी आपल्या घरी विराजमान गणेश मूर्तीच्या सभोवती सजावटीसाठी पानांच्या पत्रावळी व द्रोण यांचे इको फ्रेंडली डेकोरेशन केले आहे. "स्वच्छ वेंगुर्ले सुंदर वेंगुर्ले' व याचबरोबर पर्यावरण रक्षणाचा सुंदर संदेश या इको फेंडली सजावटीतून त्यांनी दिला आहे. 

गणेश चतुर्थी म्हटली की त्या बरोबर विविध आरास सजावटी आल्याच. ठिकठिकाणी प्लास्टिक, थर्माकोल वस्तू वापरून ह्या सजावटी पहायला मिळतात. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते. वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छतेच्या बाबतीत देशात झळकली. या पालिकेचा प्लास्टिक मुक्तीचा निर्णय ऐतिहासिक ठरला.

या सर्व बाबतीत शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभल्याने शक्‍य झाले. ही स्वच्छता व प्लास्टिक मुक्ती अशीच टिकवायची असेल तर प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात करणे गरजेचे आहे. याच हेतूने शहराचे प्रथम नागरिक या नात्याने नगराध्यक्ष गिरप यांनी आपल्या घरी विराजमान गणेश मूर्ती शेजारी कोणतेही खर्चिक किंवा पर्यावरण विघातक वस्तूंचा वापर न करता चक्क झाडाच्या पानांच्या पत्रावळीचा वापर करून गणेशाची आरास सजवली आहे. 

वेंगुर्ले पालिका स्वच्छतेच्या सर्वोच्च शिखरापर्यंत वाटचाल करत असताना या शहराचा प्रथम नागरिक म्हणून अशा प्रकारे स्वच्छतेचे प्लास्टिक मुक्तीचे संदेश कृतीतून देणे गरजेचे आहे. यामुळे शहरातील सुज्ञ नागरिकही अशाच प्रकारे हे आचरणात आणतील व यामुळे शहराचे नाव जगभरात झळकेल यात शंका नाही. 
- दिलीप गिरप,
नगराध्यक्ष  

loading image
go to top