Vidhan Sabha 2019 : निवडणूकीबाबत भास्कर जाधव म्हणाले....

मुझफ्फर खान
Saturday, 14 September 2019

चिपळूण - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अतिशय विश्वासाने पाठीवर हात ठेवला आहे. ते सांगतील त्या मतदारसंघातून मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. जिंकल्यावर शाबासकीची थाप मारणारे आणि सोबत रणांगणात उतरणाऱ्यांची मोठी फौज माझ्याबरोबर आहे. त्यामुळे कोणत्याही मतदारसंघात उभा राहिलो तरी विक्रमी मतांनी निवडून येईन आणि शिवसेना बळकट करेन, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली. 

15 वर्षानंतर भास्कर जाधव यानी राष्ट्रवादी सोडली. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ते शिवबंधनात अडकले. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता जाधव म्हणाले, राष्ट्रवादीत माझे कोणाशीही वैर नाही. कोणाबद्दल रुसवा नाही. माझा अंतरात्मा शिवसेनेचा आहे. स्वभाव आक्रमक आहे. तो शांत बसू देत नाही. त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश करीत आहे. 

भास्कर जाधव यांनी गुहागर मतदारसंघात एक बैठकही घेतली होती. त्यावेळी त्यांनी माझ्यासोबत गुहागर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावप्रमुख,वाडीप्रमुख आणि सरपंच हेदेखील प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे गुहागरच्या राष्ट्रवादीची सर्व कार्यकारिणीदेखील त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करेल असेही त्यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे आज चिपळूण, खेड आणि गुहागर तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. परंतु मोजक्‍या कार्यकर्त्यांनाच मातोश्रीवर प्रवेश देण्यात आला. 

राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या 
विधानसभेपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनेक आमदारांनी सोडचिठ्ठी दिल्याने पक्ष खिळखिळा झाला आहे. रायगडचे राष्ट्रवादीचे नेते प्रमोद घोसाळकर, आमदार दिलीप सोपल यांसह अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Bhaskar Jadhav comment