Vidhan Sabha 2019 :..याचसाठी नाकारली काका कुडाळकर यांनी काँग्रेसची उमेदवारी 

Vidhan Sabha 2019 :..याचसाठी नाकारली काका कुडाळकर यांनी काँग्रेसची उमेदवारी 

कुडाळ - होय, मी काँग्रेसची कुडाळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारली. याबद्दल मतदार, मित्रपरिवारासह हितचिंतकांची मी दिलगिरी व्यक्त करतो. काँग्रेसकडुन उमेदवारी निश्‍चित झाली; पण आपलीच माणसे विरोधात असल्याने मी थांबण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती काँग्रेसमधुन हकालपट्टी झालेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी दिली. पुढील राजकीय भुमिकेबाबत "सपेन्स' मात्र त्यांनी कायम ठेवला. 

काँग्रेस पक्षाकडुन उमेदवारी मिळविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या जिल्हाध्यक्ष विकास सावंत, प्रभारी राजन भोसले, माजी आमदार सुभाष चव्हाण यांचा मी आभारी असल्याचेही ते म्हणाले. 

श्री. कुडाळकर यांची काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी झाल्यानंतर आठ दिवसांनी येथील स्पाईस हॉटेलमध्ये माध्यमासमोर येवुन त्यांनी आपली राजीनाम्याबाबत भुमिका स्पष्ट मांडली. यावेळी  सफराज नाईक उपस्थित होते. 

श्री. कुडाळकर म्हणाले, ""भाजप सोडल्यावर आपल्याला शिवसेनेने ऑफर दिली होती; पण जिल्ह्यात प्रबळ विरोधी पक्ष असावा. याकरीता आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये संघटनात्मक पद मागत होतो; पण पक्षाने दखल घेतली नाही. लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी प्रयत्न करुन प्रसंगी पक्षासाठी पदरमोड केली. जिल्ह्यातील संघटनेबाबत वरिष्ठांना बोललो; पण त्यांनी सुध्दा लक्ष दिला नाही. काही दिवसांपूर्वी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक दिल्लीत झाली, त्यावेळी मी उमेदवार निश्‍चित करा असे सांगितले होत; पण शेवटपर्यंत उमेदवारीचा घोळ कायम राहीला. कुडाळमधील 30 सप्टेंबरच्या बैठकीत माझ्याबाबत वेगळा सुर आला. त्याच रात्री माझी काँग्रेसकडुन उमेदवारी निश्‍चित झाली; पण आपलीच माणसं विरोधात असल्याने मी थांबण्याचा निर्णय घेतला.'' 

खरं तरं मी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला नव्हता; पण करणार काय ? आपल्याच पक्षाकडून मुस्कटदाबी होत असेल तर आपण पक्षातुन दुर झालेलं बरं या हेतुने आपण काँग्रेस पक्षापासुन फारकत घेतली. लोकसभा निवडणुकीत आपलं प्रचार कमिटीत नाव होत; पण या विधानसभा निवडणुकीत प्रचार कमिटीवर नाव नाही. पक्षाने दिलेल्या कमिटमेंटबाबतही पत्ता नाही. आपली ज्या पध्दतीने हकालपट्टी झाली ती पक्षाच्या धोरणानुसार योग्य आहे. या जिल्ह्यात काँग्रेसचा पराभव करत आहे.

विशेष म्हणजे या काळात बऱ्याच राजकीय नेत्यांशी संपर्क आला. या सर्वाच्या बोलण्यातून आताच्या प्राप्त परिस्थितीचा विचार करावा, असं मला वाटलं. प्रशासनावर अंकुश ठेवणारा काका कुडाळकर ही माझी ओळख आहे. माझा कुडाळ तालुका वेगळ्या अंगाचा होता. या मतदारसंघात रोजगाराची संधी देणारा जो कोणी राजकीय पक्ष असेल त्यालाच या निवडणुकीत सहकार्य करण्याचा आमचा विचार आहे. तो राजकीय पक्ष कुडाळच्या भल्यासाठी निर्णय घेणारा हवा. राजकारणासाठी कुडाळचा वापर कुणी करू नये, असे कुडाळकर यांनी सांगितले. 

24 ला निर्णय 
मी उद्यापासून (ता.14) कुडाळचा विकास कोण करू शकतो याबाबत जनमत आजमण्यासाठी प्रचारात उतरणार आहे. मतदारांचा काय कौल आहे हे सुद्धा अनुभवणार आहे; मात्र कोणाला पाठिंबा याबाबत कुडाळकर यांनी मौन बाळगले. माझी भूमिका मी 24 ला निकालानंतर स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com