Vidhan Sabha 2019 : भाजपकडून नितेश राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

कणकवली - भाजपचे उमेदवार म्हणून नितेश राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार नारायण राणे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. 

कणकवली - भाजपचे उमेदवार म्हणून नितेश राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार नारायण राणे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. 

कणकवलीतील गांगो मंदिर येथून फेरीला प्रारंभ झाला. भाजप पक्षाच्या घोषणाबाजी देत शक्ती प्रदर्शनाने येथील निवडणूक निर्णय कार्यालयात श्री. राणे यांनी उमेदवारी अर्ज भरला.  जवळपास तासभर मिरवणूक चालली. भाजप आणि स्वाभिमान मधील कार्यकर्ते जिथे राणे आहे तिथे विजय आहे  अशी घोषणाबाजी देत होते. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात प्रचंड तणावाचे वातावरण होते

नितेश राणे यांनी गुरुवारी सकाळी नऊ वाजता भाजप कार्यालयात रीतसर भाजप सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये सामील झाले. आज सकाळी उमेदवारी अर्ज करण्यासाठी भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते. त्या नियोजनानुसार वाजत - गाजत उमेदवारी अर्ज भरण्यात आला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी या सगळ्या प्रक्रियेचे नेतृत्व केले. भाजपमध्ये राणे आल्यानंतर नाराज असलेले माजी आमदार अजित गोगटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला, मात्र भाजपमधून इच्छुक असलेले अतुल रावराणे, तालुकाध्यक्ष संदेश पटेल यांनी फारकत घेतली. तर इच्छुक असलेले भाजपचे संभाव्य उमेदवार संदेश पारकर यांनी स्वतंत्र अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपमध्ये फूट पडली आहे हे मात्र स्पष्ट जाणवले. राणे भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे स्वाभिमान पक्षाचे मनोमिलन यावरच पुढच्या कालावधीत विजयाची गणिते ठरवणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Nitesh Rane fill form from BJP in Kankavali