

local civic issue road damage
sakal
ओटवणे : गोवा आणि कोल्हापूर या दोन भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांदा-दाणोली मार्गावरील विलवडे येथे रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या महाकाय खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. संबंधित ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.