esakal | खासदार विनायक राऊत भास्कर जाधव कटुता संपली ? Political News
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार राऊत भास्कर जाधवांच्या भेटीला;
राजकीय वर्तुळात चर्चा

बंद दाराआड तब्बर अर्धा तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.

खासदार राऊत भास्कर जाधवांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चा

sakal_logo
By
- मुझफ्फर खान

चिपळूण : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी दिर्घकालावधीनंतर आमदार भास्कर जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शिवसेनेच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांसह आमदार जाधव आणि खासदार राऊत यांच्यात बंद खोलीमध्ये चाय पे चर्चा सुरू आहे. खासदार राऊत आणि आमदार जाधव यांची ही भेट जिल्ह्यात राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.

आमदार जाधव राष्ट्रवादीत असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली. शस्त्रक्रियेनंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी खासदार राऊत आमदार जाधव यांच्या घरी गेले होते. आमदार जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी खासदार राऊत जाधव यांच्या निवासस्थानी गेले होते. शिवसेना प्रवेशानंतर आमदार भास्कर जाधव यांना मंत्रीपदाने हुलकावनी दिली.

हेही वाचा: कोरोनाचा 'ताप' ओसरला, 24 तासांत देशभरात 14 हजार रुग्णांची नोंद

जिल्ह्याच्या राजकारणातही ते फारसे सक्रीय दिसत नाहीत. उच्चशिक्षणंत्री उदय सामंत जिल्ह्यात पाहणी दौरे, आढावा बैठका घेवून जिल्ह्यावर आपली छाप पाडताना दिसत आहेत. त्यांच्या अनेक दौऱ्यांमध्ये खासदार विनायक राऊतही असतात. त्यामुळे खासदार राऊत आणि मंत्री सामंत हेच जिल्ह्याची संघटना चालवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपुजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरी येथे आले होते. तेव्हा ठाकरे यांच्या सत्काराच्या वेळी खासदार राऊत यांनी लांब असलेल्या भास्कर जाधव यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा भास्कर जाधव यांनी राऊत यांचा हात झटकला.

हेही वाचा: Good News - रत्नागिरी पालिकेच्या नवीन इमारतीचा मार्ग मोकळा

भास्कर जाधव यांनी नंतर त्याचे स्पष्टीकरण दिले. नंतरच्या काळात आमदार जाधव आणि राऊत यांच्यातील अंतर वाढले होते. मी आमदार जाधव यांची भेट घेवून उत्तर रत्नागिरी भागातील संघटनेत लक्ष देण्याची विनंती करणार आहे, असे खासदार राऊत यांनी वर्षापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र जाधव - राऊत भेटीचा योग कधी जुळून आला नाही. नवरात्रोत्सवानिमित्त चिपळूणातील देवींचे दर्शन घेण्यासाठी खासदार राऊत आज चिपळूण दौऱ्यावर आले आहेत.

आज सकाळी त्यांनी प्रथम आमदार भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत हे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. बंद दाराआड तब्बर अर्धा तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.

हेही वाचा: एकरकमी 'FRP' देऊन समरजितसिंहांनी केली कारखानदारांची कोंडी

loading image
go to top