“दिल्लीतील भाजप नेत्यांनीच देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवले”

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना खासदार राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते नारायण राणे यांच्यावरही कडक शब्दात टीका केली

रत्नागिरी - महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे. परंतु, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तापिसासू आहेत. त्यांना सध्या केंद्राच्या नेतृत्वानेच सत्तेपासून बाहेर ठेवले आहे. त्यांचा दिल्लीवर स्वारी करण्याचा डाव केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात आल्यामुळेच त्यांना सत्तेपासून लांब ठेवल्याची खरमरीत टीका शिवसेना सासदार विनायक राऊत यांनी केली आहे. 

रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना खासदार राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते नारायण राणे यांच्यावरही कडक शब्दात टीका केली. सत्ता हातूतन गेल्याने त्यांचा जळफळाट होत असल्याचे सांगत विनायक राऊत म्हणाले, “दिल्लीतील काही भाजप नेत्यांनाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते. त्यांना ‘मी’ पणाचा गर्व चढला होता. याशिवाय दिल्लीतील नेतृत्वाचीही स्वप्नं पडत होती. याच कारणाने दिल्लीतील नेत्यांनी त्यांना सत्तेपासून दूर ठेवले. संघ आणि भाजपमध्ये मी पणाची भाषा चालत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी थेट ‘मी’ पणाची भाषा सुरू केली होती. ती भाषा दिल्लीतील काही नेत्यांना रूचली नाही,” अशी टीका खासदार राऊत यांनी यावेळी केली. 

हे पण वाचा बापरे! चक्क पोलीसाच्या घरात आढळला दारु साठा
 

नारायण राणेंवर निशाणा 

नारायण राणेंचा पायगुण वाईट आहे. राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते. ती कधी परत येत नाही. त्यांनी गद्दारीबाबत बोलणे म्हणजे राजकारणातील मोठा विनोद आहे. आम्ही गप्प बरणार नाही. महसूसमंत्री असताना नारायण राणे यांनी केलेले जमीन घोटाळे बाहेर काढू अशा शब्दात राऊत यांनी राणेंवर टीका केली. 

हे पण वाचाप्रियकराने प्रेमच असे केले की, शेवटी नशीबी त्याच्या कोयत्याचे वार आले  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vinayak raut criticism on devendra fadnavis