esakal | 'राणेंना पंतप्रधान बनवलं, तरी शिवसेनेला हटवण्याची कोणाच्यात ऐपत नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

sam of panhale in lanja kokan area water supply decreases in lanja vinayak raut said in yesterday

'शिवसेनेला हटवण्याची कोणाच्यात ऐपत नाही'

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरीः कोकण (kokan)आणि शिवसेनेचं (Shivsena)नातं अभेद्य आहे. नारायण राणे (Narayan Rane)सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना उद्या पंतप्रधान बनवलं तरी तरी सुद्धा कोकणातून शिवसेनेला हटविणे हे कोणाच्याही ऐपतीत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली.केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी (ता. 7) झाली. महाराष्ट्रातून चार जणांची वर्णी या मंत्रिमंडळात लागली असली तरी महाराष्ट्रातीलच दोन जणांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. (vinayak-raut-criticism-on-narayan-rane-cabinet-expansion-2021-latest-news)

याबाबत रत्नागिरीत पत्रकारांबरोबर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त चार मंत्रीपद मिळतात हेच मोठं दुःख आहे. ते मिळत असताना प्रकाश जावडेकर यांच्यासारखा कार्यक्षम मंत्री बाहेर जातो याचं दुःख फार मोठं आहे. तसेच महाराष्ट्राला मंत्रिपद देत असताना अन्याय झाला आहे. शिवसेनेशी लढण्यासाठी ज्यांची ताकद नाही अशांनी एखाद्या नारायण राणे किंवा अन्य कोणाचा वापर करायचा ठरवलं असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास आहे. पराभव काय असतो ते यापूर्वी अनेक वेळा शिवसेनेने नारायण राणेंना दाखवून दिलं असल्याचं सांगत खासदार राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपवर टीका केली आहे.

हेही वाचा- व्हेल माशाच्या उलटीची तस्करी:आरोपीस अटक; पाच कोटींचा माल जप्त

ताकद कोणामध्ये नाही: राऊत

मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर राणेंना मंत्रिपद देण्यात आलं का, यावर बोलताना राऊत म्हणाले की, मुंबई महालापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले. पण मुंबई आणि शिवसेना यांचं जे नातं आहे हे अभेद्य नातं मागच्या 30 वर्षांपासून आहे. येत्या निवडणुकीत सुद्धा शिवसेना आणि महाविकास आघाडीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकेल, तो उतरविण्याची ताकद कोणामध्ये नाही.

loading image