तेजससह जनशताब्दीचा विस्टाडोम प्रतीक्षा यादीत

तेजससह जनशताब्दीचा विस्टाडोम प्रतीक्षा यादीत

४२ (पान २ साठी)

(रेल्वेचे चित्र वापरावे)

तेजस, जनशताब्दीचा ‘विस्टाडोम’ प्रतीक्षा यादीत

दोन्ही एक्स्प्रेसचे डबे आरक्षित ; दुप्पट भाडे असूनही प्रवाशांची पसंती

खेड, ता. १६ ः कोकण रेल्वे मार्गावरील नयनरम्य हिरवळ, धबधबे आदींचा नजारा टिपण्यासाठी तेजससह जनशताब्दी एक्स्पेसच्या विस्टाडोम डब्यांना प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. सर्व डब्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट भाडे असलेल्या तेजस एक्स्पेससह जनशताब्दी एक्सप्रेसचा गणेशोत्सवातील विस्टाडोम डबा पूर्णपणे आरक्षित झाला आहे. विस्टाडोम डब्यातील तिकिटांसाठी प्रतीक्षा यादीच सुरू झाली आहे.
जनशताब्दी एक्सप्रेसच्या ६ सप्टेंबर रोजीच्या विस्टाडोम डब्याची प्रतीक्षा यादीची मर्यादाच संपल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने २०१८ मध्ये सर्वप्रथम मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्पेसला काचेचे छत व रुंद खिडक्या असलेला विस्टाडोम डबा जोडला. या डब्याला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबई- मडगाव तेजस एक्स्पेसलाही २०२२ मध्ये दुसरा विस्टाडोम डबा जोडण्यात आला. आलिशान वंदे भारत पाठोपाठ सर्वाधिक जलद गतीने धावणाऱ्या तेजस एक्स्पेसच्या विस्टाडोम डब्याला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आणखी दोन विस्टाडोम डबे जोडत प्रवाशांना विशेषतः पर्यटकांना मध्य रेल्वे प्रशासनाने सुखद धक्का दिला होता.
जनशताब्दीसह तेजस एक्सप्रेसला जोडण्यात आलेल्या पर्यटनपूरक पारदर्शक हायटेक विस्टाडोम डब्याना प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत असून दरवर्षी रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीतही तितकीच भर पडत आहे. २०२३- २४ या आर्थिक वर्षात कोकणातून धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसच्या विस्टाडोम डब्याच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला ७ कोटी ६८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न मध्य रेल्वेला विस्टाडोममुळे मिळालेले सर्वाधिक उत्पन्न आहे. याशिवाय जनशताब्दी एक्सप्रेसला जोडलेल्या विस्टाडोम डब्याच्या माध्यमातून ६ कोटी १६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गणेशोत्सवात धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण खुले होताच नियमित गाड्यांसह एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण काही मिनिटातच हाऊसफुल्ल झाल्याने चाकरमान्यांच्या हाती प्रतीक्षा यादीच पडली आहे. यामध्ये कोकण मार्गावरून धावणाऱ्या तेजस एक्सप्रेससह जनशताब्दी एक्स्प्रेसचाही समावेश असून महागडा प्रवास असूनही गणेशोत्सवात धावणाऱ्या दोन्ही गाड्या हाऊसफुल्लच झाल्या आहेत.

------
काही मिनीटातच आरक्षण फुल्ल
गणेशोत्सवात धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण खुले झाले. तसे अवघ्या काही मिनीटात नियमित आणि एक्सप्रेसचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले. त्यामध्ये कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तेजस एक्सप्रेससह जनशताब्दी एक्सप्रेसचाही समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com