
Aghori dance performance at Wada Bhimashankar Ganesh Mandal’s Ganesh Visarjan procession draws huge crowd.
Sakal
- राजेंद्र लोथे
चास : वाडा ( ता. खेड) येथील भीमाशंकर सार्वजनिक गणेश मंडळाच्या लाडक्या बाप्पाला जड अंतकरणाने निरोप देण्यात आला, नऊ दिवसांच्या भक्तीमय वातावरणात रमलेल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे भरुन आले होते, या सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत आघोरी नृत्य अविष्कार मिरवणुकीचे आकर्षण ठरला, प्रथमच सादर झालेला हा प्रकार पाहण्यासाठी मागरिकांनी मोठी गर्दी केली होती.