
पाली : सुधागड तालुक्यातील वाफेघर गावाला जोडणारा पूलाची अक्षरशः दैना झाली आहे. हा वाहतुकीसाठी व धोकादायक बनला आहे. मुसळधार पावसामुळे पुलावर खड्डे पडले असून स्लॅब च्या सळया देखील बाहेर आल्या आहेत. पुलाला संरक्षण कठडे देखील नाहीत. या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी तसेच या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.