esakal | गस्त प्रभावी होणार का ? कोकणात मच्छीमारांसमोर उभा आहे प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

waiting for speed boat fishermen use one boat for 16000 for paper boat today in ratnagiri

दिवसाला 16 हजार रूपये मोजत मत्स्य विभागाची ही गस्त महिन्याला 4 लाख 80 हजाराला पडणार आहे.

गस्त प्रभावी होणार का ? कोकणात मच्छीमारांसमोर उभा आहे प्रश्न

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये होणारी घुसखोरी रोखण्यासाठी मत्स्य विभागाला भाड्याच्याच नौकेवर अवलंबून राहावे लागणार आहे. मत्स्य विभागाला अजून स्पीड बोटीची प्रतीक्षा राहणार आहे. शासनाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने सध्या स्पीड बोटीचा विषय मागे पडला आहे. दिवसाला 16 हजार रूपये मोजत मत्स्य विभागाची ही गस्त महिन्याला 4 लाख 80 हजाराला पडणार आहे. ही मच्छीमार नौका असल्याने घुसखोरांच्या आधुनिक नौकांशी स्पर्धा करील का, गस्त प्रभावी होणार का, असा प्रश्‍न आहे.  

हेही वाचा - कोकणवासीयांचे आधिच नुकसान, आता आणखी दक्षतेचा इशारा

महाराष्ट्राच्या सागरामध्ये मलपी, गोवा, केरळ, गुजरात येथील मच्छीमारांकडुन मोठ्या प्रमाणात घुसखोरी गेली जाते. ही घुसखोरी रोखण्यासाठी मत्स्य विभाग आपल्यापरीने प्रयत्न करतो, मात्र हे प्रयत्न जुनाट सुविधांमुळे अपुरे पडत आहेत. घुसखोरी करणार्‍या नौकांचे इंजिन अधिक शक्तीशाली आहेत. त्यांचा पाठलाग मत्स्य विभागाच्या भाड्याने घेतलेल्या मच्छीमारी नौका करू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सागरी हद्दीमध्ये मासेमारी करून या नौका निघून जातात. 

हेही वाचा - कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर संबंधितावर होणार सिंधुदुर्गनगरीतच  होणार अंत्यसंस्कार 

मत्स्य विभागाला त्यांच्याकडे बघत बसावे लागते. ही परिस्थिती बदलावी, यासाठी मत्स्य विभागाने सागरी गस्तीसाठी स्पीड बोटीची मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करून ती मंजूर करण्यात आली; मात्र शासन आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याने स्पीड बोटीचा विषय मागे पडला आहे. पुन्हा भाडेतत्त्वावर नौका घेऊन गस्त घालण्याची वेळ मत्स्य विभागावर आली आहे. या संदर्भात योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून दिवसाला 16 हजार या प्रमाणे खासगी नौका भाड्याने घेण्यात येणार आहे. येत्या दोन ते चार दिवसात सागरी गस्त सुरू होणार आहे. स्पीड बोट न आल्याने मत्स्य विभागाला खासगी नौकेवर दिवसाला 16 हजार या प्रमाणे महिन्याला 4 लाख 80 हजार ही गस्त पडणार आहे.

"शासनाकडून स्पीड बोट मंजूर झाली आहे, मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे हा विषय मागे पडला आहे. खासगी नौकेला दिवसाला 16 हजार रुपये भाडे देऊन गस्त सुरू करण्यात येणार आहे."

- नागनाथ भादुले, सहाय्यक मत्स्य आयुक्त, रत्नागिरी

संपादन - स्नेहल कदम 

loading image