esakal | कडकडीत बंद; विनाकारण फिरणाऱ्यांना दंड 

बोलून बातमी शोधा

weekend lockdown impact kankavli konkan sindhudurg

दरम्यान शहरातील सर्व दुकान व्यावसायिकांनी आज दुकाने बंद ठेवली. तसेच नागरिकांनीही घराबाहेर पडणे टाळले. एस.टी., रिक्षा तसेच खासगी वाहनेही बंद असल्याने आज महामार्गावर वर्दळ थांबल्याचे चित्र होते. 

कडकडीत बंद; विनाकारण फिरणाऱ्यांना दंड 
sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) - शनिवार, रविवारी कडकडीत बंद असतानाही विनाकारण शहरात आलेल्या अनेक नागरिकांवर कणकवली पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तसेच योग्य कारण नसलेल्या अनेकांना पुन्हा माघारी पाठविण्यात आले. दरम्यान शहरातील सर्व दुकान व्यावसायिकांनी आज दुकाने बंद ठेवली. तसेच नागरिकांनीही घराबाहेर पडणे टाळले. एस.टी., रिक्षा तसेच खासगी वाहनेही बंद असल्याने आज महामार्गावर वर्दळ थांबल्याचे चित्र होते. 

शहरात सकाळपासून कडकडीत बंद स्थिती होती. काही ठराविक औषध दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने बंद होती. मच्छी आणि मटन मार्केटही बंद ठेवण्यात आले होते. तालुक्‍याच्या ग्रामीण भागातही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. सकाळच्या सत्रात येणाऱ्या रात्र वस्ती बसेस मधून एकही प्रवाशी शहरात आला नसल्याने आज तालुक्‍यातील एस.टी. सेवा देखील बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बसस्थानक परिसर देखील आज सुनासुना होता. 

शहरात बंदोबस्तात वाढ 
कणकवली तालुक्‍यात तसेच शहरातही कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. तसेच आज कोरोना निर्बंधाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणेने शहरात गस्त वाढवली होती. त्यामुळे शहरातील नागरिकांनीही घराबाहेर न पडणे पसंत केले. दरम्यान, ग्रामीण भागातून आज काही युवक शहरात आले होते. त्यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तसेच रेल्वे स्थानकात आलेल्या रिक्षा चालकांकडूनही दंड आकारण्यात आला. 

संपादन - राहुल पाटील