esakal | रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काय राहणार प्रचाराचा मुद्दा?
sakal

बोलून बातमी शोधा

ratangiri

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काय राहणार प्रचाराचा मुद्दा?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेची भाकरी करपली आहे, ती परतायची वेळ आली आहे. हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा पालिका निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा राहील असे राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तूझा यांनी सांगितले. तसेच नगराध्यक्षपदाचा चेहरा म्हणून सुदेश मयेकर यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणुक लढविण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी जाहीर केले.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष राजन सुर्वे उपस्थित होते. श्री. मुर्तुझा म्हणाले की, रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. विकास कामचे झालेली नाहीत. रत्नागिरीतील सत्ताधार्‍यांची भाकरी करपली असून ती परतायची वेळ आलेली आहे. नागरिकांनी पुन्हा त्यांनाच संधी दिली, तर आम्ही करु तोच विकास हेच पाहत रहावे लागेल. आगामी निवडणुकीत नागरिकच ठरवतील कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाही. त्यादृष्टीने निवडणुकीत उतरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी केली आहे. प्रत्येक वॉर्डात पक्षाचा उमेदवार तयार असून स्वबळावरी निवडणुक लढवू शकतो. राज्यात महाविकास आघाडी असली तरीही वरीष्ठांनी स्थानिक पातळीवर स्वबळावर लढविण्यासाठी अनुमती दिली आहे. शहरातील परिस्थिती पाहता मतदार निश्‍चितच राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करतील.

निवडणुक लढविण्यासाठी राष्ट्रवादीने मार्गदर्शकही निश्‍चित केल्याचे सांगताना ते म्हणाले, राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर हे नगराध्यक्ष पदाचा चेहरा राहणार आहेत. तिन टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून काम पाहिले असून त्यांचा अनुभवही दांडगा आहे. त्याचा उपयागे विकासकामांसाठी करणे शक्य आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणुक लढविली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 10 हजार 500 मते शहरातून मिळाली तर दोन वर्षांपुर्वी झालेल्या नगराध्यक्ष पोटनिवडणुकीतही साडेआठ हजार मते मिळाली होती. यावरुन शहरात पक्षाचे वर्चस्व आजही कायम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल. पक्षात मतभिन्नता आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी वरीष्ठांच्यासमोर बैठक होणार आहे. त्यावेळी शहराध्यक्षपदाचाही वाद सोडवण्यात येणार आहे.

पालिका इमारतीसाठी घाई कशाला?

नगरपालिका इमारतीचा कंत्राटदार ठरवण्याची सत्ताधार्‍यांना घाई झाली आहे. आपलाच ठेकेदार रहावा यासाठी ही धडपड आहे. तिन महिन्यांनी निवडणुक आली आहे, त्यानंतर हा निर्णय घेता आला असता. परंतु तसे न करता वाढीव निधी देऊन हे काम करुन घेण्यासाठी प्रयत्न आहे, असे श्री. मुर्तूझा यांनी सांगितले.

loading image
go to top