दुकानदारांचे होणार आता लाखाचे बारा हजार ....

When the shops open traders will shake their heads kokan marathi news
When the shops open traders will shake their heads kokan marathi news

साडवली (रत्नागिरी) : शिमगोत्सवामुळे देवरुख बाजारपेठेतील दुकानदारांनी नेहमीपेक्षा वाढीव माल दुकानात भरला आणि लाॅकडाउन प्रकारात दुकाने बंद ठेवावी लागली.हि दुकाने पंधरा दिवसांनी उघडली जाणार आहेत त्यावेळी दुकानदारांना कपाळावर हात मारुन घेण्याची पाळी येणार आहे.कारण तोपर्यंत यातील माल खराब होणार आहे.

घुशी,मुंग्या माल करणार खराब

दुकाने अचानक बंद करायला लागल्यामुळे व्यापारी वर्गाला कोणत्याच उपाययोजना करता आल्या नाहीत.उंदिर,घुशी,मुंग्या दुकानातील मालाची वाट लावणार आहेत.काही मालाची एस्पायरी डेट टळुन जाणार आहे.माल बरणीत बंद असल्याने तो माल खराब होणार आहे.काही मालाला पंधरा तर काहींना वीस दिवसांची मर्यादा असते असा माल खराबच होणार आहे.

बंद दुकानामुळे उंदीर
दुकाने बंद ठेवायची ऑर्डर मिळाली तेंव्हा काही व्यापार्‍यांनी दुकानात मुंग्यांची पावडर मारुन ठेवली तर काहींनी झुरळ प्रतिबंधक खडु भिंतीवर फिरवून ठेवले.तरीही होणारे नुकसान न टळणारे असल्याने दुकानदारांचे लाखाचे बारा हजार होणार आहेत .महिनाभर दुकाने बंद असल्यामुळे धुळीचे साम्राज्य व कोळीष्टके यांची जाळी दुकानात असणार आहेत.उंदरानी केलेले नूकसान जादा असणार आहे.फरसाण मार्टमधील विविध पदार्थ सर्रास बाद झालेले असणार आहेत.साफसफाई व मालाची पाहणी यातच पुन्हा पंधरा दिवस जाणार आहेत.

दुकाने उघडताना आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे याची कल्पना करुनच कपाळावर हात मारण्यापलीकडे दुकानदारांसमोर पर्याय उरलेला नाही हेच खरे.कोरोनाच्या नावाने तेव्हा खरा शिमगा होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com