

Ratnagiri: भाट्ये येथे बुधवारी रात्री झालेल्या राड्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. मटक्याची चिठ्ठी घेण्याच्या वादातून भाट्ये पुलाजवळ तेथील काहींनी एका भैय्याला चांगलाच धुतला. परंतु याबाबत शहर पोलिस ठाण्यात कोणतीच नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहराजवळ असलेल्या एका गावातील हा भैय्या आता मटका व्यवसायात उतरला आहे. मटक्याची ''चिठ्ठी'' नेहमीच्या व्यक्तीऐवजी दुसऱ्याला दिल्याच्या रागामधून हा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात सुरू होती. ''भैय्या'' नामक व्यक्तीकडे चिठ्ठी देणाऱ्याने दुसऱ्याच व्यक्तीला चिठ्ठी दिल्यामुळे भैया प्रचंड संतापला. रात्री भैयाने संबंधिताला मोबाईलवरून अत्यंत खालच्या शब्दात शिवीगाळ केली.
आपले कोणीच काही करू शकत नाही या अविर्भावात ''भैय्या'' थेट भाट्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेला. याठिकाणी संबंधित व्यक्तीला त्याने घराजवळ जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भैय्याला ती व्यक्ती भिडली. एक एक करत अनेकजण तेथे आले. त्या व्यक्तीसह कुटुंबियांनी भैय्याला धु...धु... धुतल्याची चर्चा दोन दिवस सुरू आहे.
या घटनेनंतर भैया पोलिस ठाण्यातही गेला. परंतु, मटक्याच्या चिठ्ठीवरून वाद झाल्याची तक्रार द्यायची कशी, असा प्रश्न पडल्याने भैय्या हताश होऊन माघारी परतल्याचेही चर्चा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.