

Coach Amol Muzumdar Guiding India to golden triumph
sakal
पाली : भारताला महिला वर्ल्डकप जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका असणारे मार्गदर्शक व ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार अमोल मुजुमदार हे रायगड जिल्ह्याचे सुपुत्र असल्यामुळे रायगड जिल्ह्यासह सुधागड वासियांचा उर भरून आला आहे. परिणामी सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संपूर्ण भारतासह रायगड जिल्हा व सुधागड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्याचे काम अमोल मुजुमदार यांच्यामार्फत झाले आहे.