Wildlife Hit by Torrential Rains: शंतनू कुवेसकर यांनी वनविभाग व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेचे सदस्य यांना लागलीच ही माहिती दिली. वनविभाग व वन्यजीव रक्षक यांनी मगरीला रात्री दहा वाजता सुरक्षित पकडले. या मगरीची लांबी साधारण चार फूट होती.
"Injured crocodile rescued from Mumbai-Goa Highway after heavy rains."Sakal
पाली: रायगड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाचा फटका वन्यजीवांना बसत आहे. रविवारी (ता.17) रात्री मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथील राऊत सर्जिकल हॉस्पिटलच्या समोर जखमी अवस्थेत मगर आढळून आली.