Good News ; आशा सेविकांना मिळणार वाढीव मानधन! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गटप्रवर्तक आणि आशा सेविकांना आरोग्य यंत्रणेच्या मदतीला देण्यात आले.

चिपळूण - कोविड काळात आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आशा सेविकांचा वाढीव मानधनाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री तसेच मंत्रालयस्तरापर्यंत पाठपुरावा करून हा प्रश्‍न निकाली काढला. सप्टेंबर महिन्यापासून त्यांना वाढीव मानधन मिळण्यास सुरवात होणार आहे. चिपळूण युवा सेनेचे तालुकाप्रमुख उमेश खताते यांनी यासंदर्भात सतत पाठपुरावा केला होता. 

गटप्रवर्तक आणि आशा सेविका यांना प्रशासनातील मेहनतीची आणि जोखमीची कामे या घटकांकडे दिली जातात. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गटप्रवर्तक आणि आशा सेविकांना आरोग्य यंत्रणेच्या मदतीला देण्यात आले. गावागावात सर्वेक्षण तसेच टेस्टिंग व ट्रेसिंगची आदी माहिती संकलनाचे काम आशा सेविकांनी आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून केले. शासनाने त्यावेळी जुलै महिन्यापासून त्यांना 2 हजार रुपये वाढीव मानधन देण्याची घोषणा केली होती. ग्रामपंचायतीकडून 1 हजार रुपये भत्ता देण्याचे निर्देशदेखील दिले होते; परंतु यापैकी काहीच हाती लागलेले नाही. आशा सेविकांच्या मानधनाचा विषय चिपळूण युवा सेनेचे तालुकाप्रमुख उमेश खताते यांनी हाती घेतला. खासदार विनायक राऊत यांच्याकडे आशा सेविकांची व्यथा मांडून शासनाकडून त्यांचे वाढीव मानधन मिळवून देण्याची मागणी केली होती. 

हे पण वाचाव्हायरस कार्ड अडकवा अन् कोरोना पळवून लावा

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार 
खासदार राऊत यांनी या विषयाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करून आशा सेविकांना वाढीव मानधन देण्याची मागणी केली. सप्टेंबर 2020 पासून आशा सेविकांना वाढीव मानधन मिळण्यास सुरवात होणार आहे. तसे निर्देश संबंधित विभागाने दिले आहेत. 

हे पण वाचाबाप रे; शिर धडावेगळे केले अन् गावात येऊन ओरडून सांगू लागला

 

 संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will get increased honorarium of Asha worker