शुभमंगल करताना 'नो सावधान', कोरोनाचा कहर असतानाही लग्नांचा जोर

without precaution marriage and events start in chiplun ratnagiri
without precaution marriage and events start in chiplun ratnagiri

चिपळूण (रत्नागिरी) : चिपळूणसह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत, तरीही तालुक्‍यात क्रिकेटचे सामने, लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम धूमधडाक्‍यात सुरू आहेत. बाजारपेठांतही मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी उसळू लागली आहे.

चिपळूण शहरात मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाचा आलेख वाढू लागला आहे. मागील दोन दिवसांत तब्बल ११ कोरोनाबाधित आढळले. महिन्याभरात सापडलेल्या रुग्णांची संख्या ८८ झाली आहे. यामुळे प्रशासनाने यावर कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. या आधीच यात्रा, उत्सव यावर बंदी घातली आहे. उपहारगृहात ५० टक्के क्षमतेने ग्राहक बसविण्यास सांगण्यात आले आहे. हा नियम कोणत्याही उपहारगृहात पाळला जात नाही. लग्नसोहळा साजरा करण्यासाठी फक्त ५० जणांची परवानगी देण्यात आली आहे. तरीही शेकडो लोक लग्नासाठी गर्दी करीत आहेत. त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

शहर आणि तालुक्‍यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी लग्नसोहळ्याचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. मंगल कार्यालयात जरी कमी माणसे एकत्र येऊन सोहळे साजरे होत असले तरी इतर ठिकाणच्या भागात शेकडो माणसे एकत्र येऊन लग्न व इतर कार्यक्रम साजरे करत आहेत. यामध्ये ना कोरोना नियमांचे पालन ना मुखपट्टी यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे.

"शासकीय निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना सभागृहचालकांना देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी कुठेही नियमांचे उल्लंघन करून लग्नसोहळे, क्रिकेटचे सामने आयोजित केले जात असतील, तर त्यावर कारवाई केली जाईल. लग्न समारंभात मर्यादेपेक्षा जास्त लोक असतील तर सभागृहाच्या मालकासह आयोजकांवर आणि पाहुण्यांवरदेखील गुन्हे दाखल केले जातील."

- प्रमोद ठसाळे, प्रशासकीय अधिकारी, चिपळूण

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com