कोकणात मुसळधार पावसाने धुमाकुळ : विजच्या धक्क्याने एक महिला मृत तर दोन जण बेशुध्द

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

संगमेश्वर तालुक्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

 देवरुख (रत्नागिरी) : मंगळवारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्यात अक्षरश : धुमाकुळ घातला आहे. भातशेतीच्या नुकसानी बराेबरच तालुक्यातील तुळसणी येथे विजच्या धक्क्याने एक महिला मृत झाल्याची दुदैवी घटना घडली तसेच मेघी सोलकरवाडी येथे विज पडल्याने हसम कुटुंबातील दोन जण बेशुध्द पडले होते. या जखमींवर देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

संगमेश्वर तालुक्यात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. विजाच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ८ वाजेपर्यंत पाऊस व विजांचा कडकडाटाने तालुक्यात धुमाकुळ घातला. तुळसणी येथे वीज कोसळली. येथील महिला रियाना दिलावर मुकादम ( ४५ ) या कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या . याचवेळी कोसळलेल्या विजेच्या धक्क्याने मुकादम या बेशुध्द पडल्या त्यांना तात्काळ उपचारासाठी देवरुखात खासगी व ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र वैद्यकिय सुत्रांनी तपासणी करुन त्याना मृत घोषित केले. 

हेही वाचा- तोतया तहसीलदाराने लग्नाचे, नोकरीचे दिले वचन आणि तिला फसवले १२ लाखाला -

तर तालुक्यातील मेघी सोलकरवाडी येथे विज कोसळण्याचा प्रकार घडला . ही विज सागाच्या झाडावर पडल्याने झाड चिरले गेले आहे. या झाडाजवळ घर असलेल्या कुटूंबियांना याचा धक्का बसला. कुटुंबातील संदीप जयराम हसम व पूजा दीपक हसम हे बेशुध्द पडले. ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्याबरोबरच घरातील पाच लहान मुलांना देखील किरकोळ धक्का बसला. दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय सुत्रांनी दिली आहे. विजांच्या कडकडाट व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman died in an electric shock at Tulsani in the taluka near the damage to paddy fields