तोतया तहसीलदाराने लग्नाचे, नोकरीचे दिले वचन आणि तिला फसवले १२ लाखाला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

विधवा महिलेशी तोतया तहसीलदाराने मधुकर दोरकर या नावाने भावनिक पत्रव्यवहार केला.

रत्नागिरी : तो तोतया तहसीलदार भलताच बंडलबाज निघाला. विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच आपले घर बांधण्यासाठी जागा घ्यायची आहे, त्या महिलेच्या भावाला सरकारी नोकरी लावतो, अशा अनेक आमिषांना बळी पडून त्या महिलेचे १२ लाख रुपये लुबाडल्याची संशयिताने कबुली दिली. 

हेही वाचा - रुग्णांना धीर देण्याऐवजी लूटच ; आठ लाख बील होतच कसं ? -

तालुक्‍यातील चांदोर येथील ही महिला आहे. त्यांनी याबाबत शहर पालिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून तोतया तहसीलदाराला अटक केले. त्यानंतर त्याच्या या करामती पुढे आल्या. विधवा महिलेशी तोतया तहसीलदाराने मधुकर दोरकर या नावाने भावनिक पत्रव्यवहार केला. त्यानंतर दोरकर आणि त्या महिलेची ओळख वाढत गेली.

आपण तहसीलदार म्हणून शासकीय सेवेत आहे, अशी बतावणी करून ३ फेब्रुवारी २०२० ते ३१ जुलै २०२० या कालावधीत वेगवेगळी आमिष आणि कारणे सांगितली. विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. आपले घर बांधण्यासाठी जागा घ्यायची आहे, तुझ्या भावाला सरकारी नोकरीत लावतो, अशी आमिषे दाखवून त्या महिलेचे १२ लाख रुपये लुबाडल्याची संशयिताने कबुली दिली. यातील कोणतेही काम न करता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या 
लक्षात आहे. महिलेने या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा -  मत्स्योत्पादनावर चक्रीवादळाचा परिणाम ; साडेसात हजार टन घटले -

सांगलीत जाऊन माहिती काढली

दरम्यान, तपास सुरू असताना संशयिताचा फोटो निष्पन्न झाला. त्यावरून गुप्त खबऱ्याकडून शोध सुरू झाला. पथकाने सांगली येथे जाऊन माहिती काढली. त्यानुसार संशयित आरोपी प्रकाश कल्लेशा पाटील उर्फ मधुकर दोरकर याला अटक केली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one fraud identity man as a teshil officer cheat to win in women attract with marriage in ratnagiri