esakal | अभिनंदनीय ! सापडलेले दोन लाख रुपये महिलेने दिले परत
sakal

बोलून बातमी शोधा

Women Found Two Lakh Rs Returned To Sawantwadi Police

गवळीतिठा येथील प्रसाद बर्गे यांची रक्कम असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस व बॅंक प्रशासनाच्या वतीने ती त्यांना देण्यात आली.

अभिनंदनीय ! सापडलेले दोन लाख रुपये महिलेने दिले परत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - माणुसकी सर्व ठिकाणी जन्म घेते; मात्र माणुसकी प्रत्येक ठिकाणी जन्माला येतेच असे नाही. अशीच प्रामाणिक माणुसकीचे उदाहरण आज पहायला मिळाले. शहरातील एका महिलेने सापडलेले तब्बल 1 लाख 98 हजार रुपये परत करत ही माणुसकी दाखविली. 

येथील गवळीतिठा येथील प्रसाद बर्गे हे शहरातील एका एटीएम मशीनजवळ डिपॉझिट करण्यासाठी गेले होते. पैसे डिपॉझिट करून ते माघारी फिरले. त्यानंतर संजना जाधव या एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या असता त्यांना 1 लाख 98 हजार रुपये त्याठिकाणी सापडले. याबाबत त्यांनी पोलीस प्रशासनाशी व बॅंक कर्मचाऱ्याशी संपर्क साधून माहिती देऊन आपला प्रामाणिकपणा दाखविला. 

येथील शहरातील एटीएम केंद्रात दोन लाखाची रोकड एका महिलेला मिळाल्याची बातमी सोशल मीडियावर आली. ती बातमी प्रसाद बर्गे यांनी वाचली व पोलिसांशी तातडीने संपर्क साधला. यावेळी त्यांनी आपल्या माहितीत 2 लाख रुपयांची रक्कम आपण आपल्या बहिणीला फ्लॅटची नोंदणी करण्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी मशिनद्वारे कॅश डिपॉझिट केले होते; मात्र त्यातील दोन हजारच तिला मिळाले उर्वरित रक्कम तिला मिळाली नाही, असे सांगितले.

त्यापैकीच ही रोकड असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनतर बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या साहाय्याने ती बर्गे यांचीच असल्याची खातरजमा केल्यावर त्यांना परत करण्यात आली. यामध्ये श्री. बर्गे यांनी संजना जाधव यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल आभार व्यक्त केले. 

गवळीतिठा येथील प्रसाद बर्गे यांची रक्कम असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस व बॅंक प्रशासनाच्या वतीने ती त्यांना देण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब बाबर व हवालदार गुरुनाथ तेली यांच्या हस्ते दोन लाखाची रोकड परत करून प्रामाणिकपणा दाखविणाऱ्या खासकीलवाडा येथील संजना संजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला.  

 
 

loading image
go to top