कोविड आणि तौक्ते वादळाच्या काळात पोलीसांचे काम कौतुकास्पद

कोविड आणि तौक्ते वादळाच्या काळात चांगले काम केल्याबद्दल गृह (शहर), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पोलीस दलाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या
kokan
kokansakal

ओरोस : जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याची माहिती येणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांना एका क्लीकवर उपलब्ध व्हावी यासाठी एसओपी तयार करावा, अशी सूचना देतानाच कोविड आणि तौक्ते वादळाच्या काळात चांगले काम केल्याबद्दल गृह (शहर), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पोलीस दलाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

kokan
ICICI बँकेच्या ऑनलाईन बँकिंग सेवा ठप्प; ग्राहक वैतागले!

गृहराज्यमंत्री पाटील यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात विभागाचा, भारत नेट, म्हाडा, पंतप्रधान आवास योजना, परिवहन आणि एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते.

kokan
कर्मयोगी कारखाना निवडणूक: ६ अर्ज बाद तर, ४० अर्ज वैध

सुरुवातीला झालेल्या पोलीस विभागाच्या आढावा मनुष्यबळ उपलब्ध साधन सामग्री, सुविधा, राबवलेले उपक्रम, जिल्ह्याचा गुन्ह्यांबाबतची माहितीचे पोलीस अधिक्षक दाभाडे यांनी संगणकीय सादरीकरण केले. राज्यमंत्री पाटील म्हणाले, कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले आहे. पोलीसांची विश्वासहार्ता टिकून आहे यावरच राज्याची प्रगती सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम पोलीस यंत्रणा करत आहे. प्रायोगिक तत्वावर पोलीस अधिकाऱ्यांनी तालुक्याचे पालकत्व घेऊन गावागावातील तंटे विशेषतः जमिनीविषयक महसूल यंत्रणेच्या समन्वयातून सोडवावेत.

kokan
आपणचं पैगंबर असल्याचा महिलेचा दावा; कोर्टानं सुनावला मृत्यूदंड!

मोहल्ला समिती, शांतता समितीमध्ये 18 ते 30 वयोगटातील युवकांचा समावेश करावा. जिल्ह्यात बदली होऊन येणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्ह्याची माहिती एक क्लीकवर मिळावी यासाठी माहिती व तंत्रज्ञानचा वापर करून डाटा बेस तयार करावा. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना लसीकरणाबाबत विचारणा करावी. ते पूर्ण करण्यासाठी समन्वय करावा. जेटीच्या लॅडिंग पॉईंटच्या ठिकाणी सौर ऊर्जेवर आधारीत सीसीटीव्ही, जन सूचना प्रणाली कार्यान्वीत करावी. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळवावा.

kokan
रायगव्हाण व तावरजाची ओव्हरफ्लोकडे वाटचाल

एनसीसीआरटी पोर्टलवरून सायबर गुन्ह्याबाबत प्राप्त झालेल्या पॉपअप नंतर बॅंकांना कळविल्यानंतर त्यांच्याकडून कोणता प्रतिसाद मिळाला याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत सादर करावा. पोलीस कल्याण निधी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबत विशेषतः सुदृढ बालिका अनुदानविषयी जनजागृती करावी.

भारत नेटच्या कामकाजाबाबत आढावा घेऊन राज्यमंत्री पाटील यांनी अतिवृष्टी, वादळ याचा विचार करून नियोजन केले आहे का, यामध्ये काही बदल करता येत असतील तर तसे नियोजन ठेवावे, ग्रामपंचायती, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र ऑप्टिकल फायबरद्वारे जोडण्यात आले आहेत का ? याविषयी नियोजन करावे. याकामकाजाबाबत जिल्ह्याची प्रगती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com