जागतिक योग दिन विषेश : "लक्ष्य सूर्यनमस्काराचे' निरोगी आणि आनंद जगण्याची गुरुकिल्ली योगच....

World Yoga Day Special ratnagiri artical
World Yoga Day Special ratnagiri artical

रत्नागिरी - श्रीमद्‌ भगवद्‌गीतेमध्ये "योगः कर्मसु कौशलम्‌, पतंजलीनी योगः चित्तवृत्ती निरोधः' अशी योगाची व्याख्या केली आहे. या योगशास्त्राच्या व्याख्या असे सांगतात, की आपल्या कामातील कार्यातील कौशल्य, कुशलता म्हणजे योग. चित्तवृत्तींवर शाश्‍वत जीवनाच्या मार्गावर योग आपणाला घेऊन जातो. जीवनाची बाल्यावस्था, प्रौढ किंवा वृद्धावस्था या तीनही स्तरावर योग आपणाला अतिशय उपयुक्त ठरतो, हे प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे. 


जगाची गरज लक्षात घेऊन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "योग' जगासाठी खुला केला. योगाची उपयुक्तता व अनिवार्यता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा "जागतिक योग दिन' म्हणून घोषित केला व सर्व जगाने त्याचा स्वीकार केला. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील नामांकित अशी शिक्षणसंस्था आहे. या सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशाला, जीजीपीएस व गुरुकुलमध्ये योगाची प्रशिक्षण केंद्रे चालतात.

सद्यःस्थितीत या शाळांमध्ये सायंकाळी 6 ते 8 या वेळेत योगाचे प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून र. ए. सोसायटीच्या या शाळांचे विद्यार्थी राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावर योगपटू म्हणून आपली मोहर उमटवून आले आहेत. या खेळांमधून पूर्वा किनरे, प्राप्ती किनरे, सृष्टी जाधव, प्रीतिश दीक्षित, दुर्वांकूर चाळके, ओम जैन, गार्गी आयरे अशा अनेक योगपटूंनी अनमोल कामगिरी करून आपल्या शाळेचे व रत्नागिरीचे नाव उज्ज्वल केले आहे. शाळा व संस्था सातत्याने अशा विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभी असलेली दिसते. 


योगमार्गदर्शक रवीभूषण कुमठेकर, राजेश आयरे, सौ. श्रद्धा जोशी, किरण सनगरे, किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने योगाची प्रगती होत असलेली पाहावयास मिळते. रा. भा. शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गायत्री गुळवणी, संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, संस्थेचे पदाधिकारी यांच्या सातत्याने योगाच्या विविध स्पर्धांच्या आयोजनात साथ मिळाली आहे. त्या माध्यमातून "लक्ष्य सूर्यनमस्काराचे' उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

 
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये योगाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना करिअरसाठी योगाचे धडे देणारी र. ए. सोसायटी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था असावी, असे वाटते. त्यासाठी संस्थेच्या शालेय अभ्यासक्रमात योगशास्त्राचाही समावेश केला आहे. संस्था व शाळेच्या पदाधिकाऱ्यांची व्यापकदृष्टी आपणास पाहावयास मिळते. जागतिक योगदिनानिमित्त सर्वांना आपले जीवन निरोगी व कार्यक्षम ठेवण्यासाठी प्रेरणा मिळावी. योगाच्या माध्यमातून आपण निरोगी जीवन जगू शकतो. त्यामुळे नियमित योग करणे अनिवार्य आहे. 

कोरोनाच्या (कोविड-19) पार्श्‍वभूमीवर जागतिक योग दिन साजरा करताना त्याची सामाजिक अनिवार्यता ठळकपणे जगासमोर, तुमच्या आमच्यासमोर येत आहे. निरोगी आणि आनंद जगण्याची गुरुकिल्ली योग आपल्याला देतो. त्यामुळेच आनंदी जीवनाचा राजमार्ग म्हणजे योग असे म्हटले जाते. 
- राजेश आयरे, योगशिक्षक व योगपंच 
अध्यक्ष, रत्नागिरी योगा असोसिएशन 
संचालक बाळासाहेब पित्रे योग संशोधन व प्रशिक्षण संस्था 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com