कुडाळात पुरुषांनीही केली वडाची पूजा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

कुडाळ - जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून येथील पुरुष मंडळींनी वडाची पूजा केली. गेली आठ वर्षे हा अनोखा उपक्रम ते राबवित आहेत. याचे राज्यभर कौतुक होत आहे.

कुडाळ - जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून येथील पुरुष मंडळींनी वडाची पूजा केली. गेली आठ वर्षे हा अनोखा उपक्रम ते राबवित आहेत. याचे राज्यभर कौतुक होत आहे.

हिंदू सणामध्ये वट पौर्णिमा या सणाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात वट पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हे व्रत विवाहित महिला आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून करतात. यासाठी वटवृक्षाची, वडाच्या झाडाची पूजा व प्रार्थना करतात. वटपौर्णिमाच्या निमित्ताने कुडाळ येथे आज पुरुष मंडळींनी गवळदेव येथे वटपौर्णिमा साजरी केली. जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला निरोगी दीर्घायुष्य मिळावे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी डॉ. निगुडकर, बॅ. नाथ पै संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, प्राचार्य अरुण मर्गज, डॉ व्यंकटेश भंडारी, किरण करंदीकर, सुरेश वरक, नितीन बांबर्डेकर, बळीराम जांभळे, संतोष पडते, शांताराम गांवकर आदींनी सहभाग घेतला. 

डॉ. निगुडकर, गाळवणकर यांची संकल्पना 
वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हा पूजेचा एक हेतू असतो. सुपामध्ये पाच प्रकारच्या फळांचे वाटे सजवतात व वान म्हणून देतात. िस्त्रयांप्रमाणे पुरुषांनीही वटपौर्णिमा साजरी करत वडाच्या झाडाची पूजा केली. गवळदेव मंदिराजवळ असलेल्या वडाच्या झाडाला दोर बांधून पुरुषांनी सात फेऱ्या मारल्या. डॉ. संजय निगुडकर, उमेश गाळवणकर यांच्या संकल्पनेतून हा सण साजरा करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worship of Ficus tree by men in Kudal on Vat Pournima